दिपक खिलारे,
इंदापूर (:हवेलीनामा प्रतिनिधी)
पुणे जिल्हा परिषदेच्या दि. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बावडा-लुमेवाडी जि. प. गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार म्हणून अंकिता हर्षवर्धन पाटील (ठाकरे) यांचा उमेदवार अर्ज इंदापूर तहसील कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे बुधवारी(दि. 21) दाखल करण्यात आला.
अंकिता पाटील ठाकरे यांचा अर्ज दाखल करणेसाठी हजारो कार्यकर्ते मिरवणुकीने इंदापूर शहरातील दूधगंगा दूध संघ ते तहसिल कार्यालय असे वाजत-गाजत आले होते, त्यामुळे परिसरात दुमदुमून गेला होता. अंकिता पाटील ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज सुचक उदयसिंह विलासराव पाटील यांनी दाखल केला.
यावेळी प्रदीपमामा जगदाळे, राजवर्धन पाटील, मनोज पाटील, निरा भिमा कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, बावडा गावच्या सरपंच पल्लवी गिरमे उपस्थित होत्या.
तसेच बावडा-लुमेवाडी जिल्हा परिषद गटा अंतर्गत बावडा पंचायत समिती गणातून धनश्री किरण पाटील (चाकाटी) व लुमेवाडी पंचायत समिती गटातून शिवाजी विजयसिंह मोहिते (टणु ) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अंकिता पाटील ठाकरे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहात सुमारे तीन वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून प्रभावीपणे काम केले आहे.
____________________________
