अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी). राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींचा पादुका दौरा श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने यावर्षी सोलापूर, लातूर, हैदराबाद ,सांगली येथे यशस्वीपणे गेली दोन महिने पूर्ण करण्यात आला .त्यानंतर या पादुका समर्थ भक्तांसोबत येत्या शुक्रवार दि. २३ जानेवारी २०२६ रोजी पादुका सायंकाळी पाच वाजता सातारा येथे येत आहेत .शिवसमर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शाहुनगरीत यंदाही श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचे प्रचार दौरा करुन आगमन होत आहे.
श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड व श्री समर्थ रामदास स्वामी भक्त मंडळ सातारा यांचे वतीने शिवतीर्थ , पोवई नाका येथे या समर्थ पादुकांचे स्वागत व आगमन सोहळा शाहुनगरीचे नूतन नगराध्यक्ष अमोल मोहिते व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते या पादुकांचे पूजन होणार आहे. त्यानंतर या समर्थ पादुकांची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात येणार आहे .वारकरी दिंडी सोबत ही मिरवणूक पोवई नाका येथून सुरू होऊन मल्हार पेठ ,शेटे चौक, कमानी हौद,देवी चौक मार्गे मोती चौकात येऊन त्यानंतर समर्थसदन ,राजवाडा येथे येणार आहे.या मिरवणूक सोहळ्यात सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ. अच्युतराव गोडबोले,कार्यवाह समर्थ भक्त योगेशबुवा रामदासी, श्री रामदास स्वामी भक्त मंडळ चे कार्याध्यक्ष रंगराव जाधव, अध्यक्ष लक्ष्मण भंडारे, उपाध्यक्ष नारायण खरे ,खजिनदार मनोहर कुमठेकर, सचिव अभय गोडबोले यांनी केले आहे .पादुका मिरवणूक स्वागत समितीचे अध्यक्ष रवींद्र सबनीस ,सचिव मोहन साठे, साहेबराव जांभळे, सहसचिव तसेच कार्यवाहक व सजावट प्रमुख म्हणून राजेंद्र कासट, रवींद्र परांजपे ,भास्कर मेंहेंदळेआदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत
