दिपक खिलारे,
इंदापूर :(हवेलीनामा प्रतिनिधी)
राज्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असुन तालुक्यातील शेळगाव पंचायत समिती गणा मधून भारतीय जनता पार्टी चे उपाध्यक्ष सत्यजीत रणवरे यांना पक्षा कडून उमेदवारी अर्ज भरण्याच्या सुचना देण्यात आल्या असून वरीष्ठ पातळीवरून पक्ष निष्ठ कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या व सर्व समिकरण लक्षात घेऊन सत्यजीत रणवरे यांना या सुचना देण्यात आल्या आहेत.
शेळगाव निमसाखर गणा मधुन भारतीय जनता पार्टीसाठी पुरक वातावरण असुन या गणातुन सत्यजीत रणवरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाले असल्याचे मानले जात आहे.
शेळगाव पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण पुरुष प्रवर्गाचे आरक्षण पडले असुन या गणा मधुन भारतीय जनता पार्टी कडून निमसाखर चे सत्यजीत रणवरे हे इच्छुक आहेत.तर भारतीय जनता पार्टी चे विविध उपक्रम, योजना व विचारधारा सर्व सामान्य माणसा पर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्यरत असणारे रणवरे हे विरोधकांन समोर मोठे आव्हान उभे करु शकतात.
त्यामुळे भारतीय जनता पार्टी कडून रणवरे यांच्या उमेदवारी वर शिक्कामोर्तब लवकरच केले जाण्याची शक्यता आहे.
