थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत असून या प्रक्रियेत उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असून पूर्व हवेलीतील सहा जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी दमछाक होताना दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या दोन तुल्यबळ पक्षांमध्ये पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकांप्रमाणे मोठी रस्सीखेच चालू असल्याचे दिसून येते परंतु यामध्ये इच्छुक उमेदवार मात्र फरफटला जात आहे.
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर – कदम वाक वस्ती, थेऊर आव्हाळवाडी, उरुळी कांचन – सोरतापवाडी,केसनंद – कोरेगाव मूळआणि पेरणे या जिल्हा परिषद गटामध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारांची नावे जाहीर केली तर काही ठिकाणी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले परंतु कोणत्याच गटामध्ये दोन्हीही पक्षांकडून कुठला उमेदवार लढत देणार हे मात्र निश्चित झाले नसल्याने उद्या दिनांक 21 जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा कालावधी असल्याने उमेदवारांना संबंधित पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून मिळणारे पत्र कधी मिळणार आणि उमेदवारी अर्ज कधी भरणार हीच धाकधूक वाढली आहे.
दुसऱ्या टप्प्यात देखील अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांना पक्षश्रेष्ठीकडून अधिकृत उमेदवाराचे पत्र मिळविण्यासाठी मोठी पळापळ करावी लागली शेवटच्या क्षणी काही जणांना हे पत्र मिळाले तर काही जणांना मिळालेच नाही त्यामुळे नाराज नाट्य निर्माण झाले आता या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मध्ये अशीच परिस्थिती उद्भवणार का काहीसे असेच चित्र सध्यातरी अनुभवास येत आहे.
पहिल्या दोन्ही टप्प्यांमध्ये भाजपची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरल्याने या पक्षाकडून आपणास उमेदवारी मिळावी यासाठी काहीजण वाट पाहत असून नेमके कुणाला उमेदवारी मिळणार हे लवकरच कळेल. ज्या उमेदवारांना पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून पत्र मिळाले त्यांनी अर्ज सादर केले आहेत तर काही उमेदवार मात्र आणखी उमेदवारीसाठी प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते त्यामुळे शेवटच्या दिवशी या उमेदवाराची मोठी कसरत लागणार हे निश्चित.
