थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) जिल्हा परिषद समिती निवडणुका घडामोडींना वेग आला असून कोणत्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवायची यावर उमेदवारांमध्ये मोठी चलभीचल झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असले तरीही नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्यावर उमेदवारांमध्ये मोठी गोंधळाची परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात देखील भाजपने आपली ताकद वाढवली असल्याने या पक्ष्याचे तिकीट मिळविण्यासाठी धडपड चालू आहे.

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर कदमवाकवास्ती जिल्हा परिषद गटात देखील कोणत्याही पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही त्यामुळे हा सस्पेन्स आणखी गडद होते जात आहे. या गटामध्ये भारतीय जनता पक्षाची चांगली ताकद असल्यामुळे एनवेळी गणित बदलली तर नवल नाही. त्यामुळे सर्वच उमेदवार अतिशय काळजीपूर्वक आपली भूमिका मांडत आहेत.

थेऊर आव्हाळवाडी गटात राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवार जाहीर केले असले तरीही उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत आणखी काय घडामोडी घडतात हे देखील पाहणे महत्वाचे ठरेल गेली अनेक वर्षांपासून पक्षाचे पदाधिकारी म्हणून काम केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यास डावलल्याने पक्षाला फायदा होणार की तोटा हे निवडणूकी नंतर निकालानंतर कळेल. तर आपल्याला डावालल्या मुळे पुढील भूमिका काय घेणार हे देखील महत्वाचे आहे. सध्य:स्थितीत या गटात तीन उमेदवार आपापल्या परीने मतदारांना आपली भूमिका मांडताना दिसत आहेत.

उरुळी कांचन सोरतापवाडी गटात भाजप कडून उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आणि काँग्रेस पक्ष आपले उमेदवार उभे करणार असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.

केसनंद कोरेगाव मूळ गटात राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेत उमेदवार जाहीर केला आहे आता या उमेदवाराविरोधात कोणत्या पक्षाचे उमेदवार असणार हे निश्चित झालं नाही लवकर याबद्दल माहिती समोर येईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *