प्रविण कांबळे,
खामगांव फाटा (हवेलीनामा प्रतिनिधी ) दौंड तालुक्यातील पारगाव पंचायत समिती गणातील पारगाव, पिंपळगाव, खोपोडी, दापोडी, देलवडी आणि गलांडवाडी यांसारख्या मोठ्या पट्ट्यातून एका सामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवाराला संधी मिळावी, अशी जनभावना समोर येत असून खोपोडी येथील आबासाहेब चोरमले यांच्या पत्नी सौ. प्रज्ञा चोरमले यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे या पंचायत समिती गणामध्ये चांगलीच रंगत वाढणार असल्याचे दिसून येत आहे विशेष म्हणजे आबासाहेब चोरमले हे भाजपचे खंदे कार्यकर्ते असून दौंड चे लोकप्रिय आमदार राहुल कूल यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत. ही स्थानिक राजकारणातील मोठी घडामोडी मानली जात आहे यास स्थानिकांचा वाढता पाठिंबा दिसून येत आहे त्यामुळे या पंचायत समिती गणातील निवडणुकीची गणित कशी जुळतात हे येत्या दोन दिवसातच निश्चित होईल याकडे सर्वांचेच लक्ष लागून
आमदार राहुल दादा कुल यांच्या माध्यमातून शासकीय योजना आणि विकासकामे तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.नवीन आणि अभ्यासू चेहऱ्यांना संधी मिळण्याची मागणी जोर धरत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे
“प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः”ही आबासाहेब चोरमले यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना अत्यंत समंजसपणा दाखवला आहे.छोट्या गावाला संधी हा कळीचा मुद्दा पुढे येत असून अनेकदा मोठ्या गावांनाच राजकारणात प्राधान्य दिले जाते, अशी भावना छोट्या गावातील कार्यकर्त्यांमध्ये असते. मात्र, यावेळी “छोट्या गावाला संधी मिळावी” हा सूर उमटत असल्याने राहुल कुल यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
