थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) ऊरूळी कांचन पसिरातील एका डॉक्टरचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी करणाऱ्या चार आरोपींना ४८ तासांचे आत ताब्यात घेवून खंडणीची रक्कमेसह गुन्हयात वापरले वाहन असा एकूण १५,८०,०००/- रू. चा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा व ऊरूळी कांचन पोलीस स्टेशन ने प्रगत करत मोठी कामगिरी केली.

विठ्ठल किसन चौधरी वय ५८ वर्षे व्यवसाय डॉक्टर रा. कुंजीर वाडी, ता. हवेली जि. पुणे हे दि. १०/०१/२०२६ रोजी रात्री १०/१५ वा. सुास सोलापूर-पुणे हायवे रोडने ऊरूळी कांचन बाजुकडून कुंजीर वाडी कडे त्यांचेकडील कार मधून जात होते. त्यांचेसोबत ड्रायव्हर राजेंद्र छगन राजगुरु हा होता. इनामदार वस्ती येथे डॉक्टरांचे कारला पांढरे रंगाची इरटीगा कार आडवी मारण्यात आली व डॉक्टरांची कार थांबविली. इरटीगा कारमधील चार अनोळखी आरोपी डॉक्टरांचे कारमध्ये बसले आणि त्यांना चाकूचा धाक दाखवून जीव मारण्याची धमकी दिली आणि डॉक्टरांचे अपहरण करून पुन्हा ऊरूळी कांचन येथून शिंदवणे बाजूकडे घेवून गेले. डॉक्टरांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडून ०४ लाख रुपये खंडणी घेवून चौफुला येथे सोडले आणि आणखी १५ लाख रुपये खंडणी मागितली व नाही दिली तर जीवे ठार मारू अशी धमकी दिल्याने डॉक्टरांनी भितीपोटी दि. १२/०१/२०२६ रोजी १५ लाख रुपये देखील दिले असे एकूण १९ लाख रूपयांची खंडणी यात डॉक्टरांकडून उकळली.

 

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत योग्य ते मार्गदर्शन व सुचना देवून स्थानिक गुन्हे शाखा व ऊरुळी कांचन पो स्टे कडील अशी दोन पथके तयार केली. सदर गुन्हयाचा समांतर तपास हा तपास पथकांमार्फत सुरू करणेत आला. फिर्यादी व साक्षीदारांकडे तपास करत असताना डॉक्टरांचे ड्रायव्हर वरील संशय बळविला आणि ड्रायव्हरचा गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तपास पथकाने ड्रायव्हर १) राजेंद्र छगन राजगुरु वय ३२ वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा. अनंतपुर, पैठण जि. छत्रपती संभाजीनगर वास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने डॉक्टरांचे अपहरण त्याचे साथीदारांचे मदतीने करून खंडणी घेतली असल्याचे सांगितले. त्या माहितीचे आधारे व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे २) संतोष सोमनाथ बनकर वय ३६ वर्षे, रा. अनंतपुर, पैठण जि. छत्रपती संभाजीनगर, ३) दत्ता ऊर्फ गोटू बाळू आहेर वय ३४ वर्षे व्यवसाय शेती, रा. अनंतपुर, सी. आर. गेट, पैठण जि. छत्रपती संभाजीनगर, ४) सुनील ऊर्फ सोनू मुरलीधर मगर वय ३० वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. गणेश नगर, गारखेडा परिसर, जि. छत्रपती संभाजीनगर, यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेली पांढरे रंगाची इरटीगा कार किं. रू. ८,००,०००/- व गुन्हयातील खंडणीची रक्कम ७,८०,०००/- असा एकूण १५,८०,०००/- रू.चा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, दौंड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो.नि. सचिन वांगडे, ऊरूळीकांचन पो.स्टे., सपोनि ज्ञानेश्वर बाजीगरे, ऊरूळीकांचन पो.स्टे., स्था.गु.शा.चे पो.स.ई. अमित सिदपाटील, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, आसिफ शेख, राजू मोमीण, योगेश नागरगोजे, धिरज जाधव, अजित काळे, प्रविण चौधर, निलेश जाधव, प्रशांत पवार, विशाल रासकर, सुमित वाघ, दिपक यादव, अमोल राऊत यांनी केली असून पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर बाजीगरे, ऊरूळी कांचन हे करत आहेत,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *