थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) थेऊर आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रचारामध्ये रंगत वाढले संधीचे दिवस यामध्ये अधिकच चुरस अनुभवास येत आहे मांजरी खुर्द येथील उद्योजक प्रकाश सावंत यांच्या पत्नी सौ.पुष्पलता प्रकाश सावंत यांनी जिल्हा परिषद लढविण्याची तयारी पूर्ण केली असून या मतदार संघातील सहाही गावात आतापर्यंत दोन प्रचाराच्या फेऱ्या पूर्ण केल्या आहेत यामध्ये त्यांना थेऊर कुंजीरवाडी आळंदी म्हातोबा या पंचायत समिती गणामध्ये थेऊर येथील उद्योजक आणि गुरुदत्त उद्योग समूहाचे संस्थापक सयाजी काकडे तसेच हवेलीच्या माजी सभापती चंद्रभागा काकडे यांचे पुतणे योगेश काकडे तर कोलवडी मांजरी आव्हाळवाडी या गणामध्ये अशोक गायकवाड यांच्या पत्नी पूनम गायकवाड यांच्या सोबतीने या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. या अनुषंगाने थेऊर पंचायत समिती गणासाठी काकडे मळा येथे एका घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यासाठी मोठ्या संख्येने तरुण वर्ग उपस्थित होता आणि या निवडणुकीमध्ये एक मुखाने योगेश काकडे व पुष्पलता सावंत यांच्या पाठीशी उभे राहून या निवडणुकीमध्ये भरघोस मताने निवडून आणण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.
या बैठकीमध्ये अनेक तरुण कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले योगेश काकडे यासारखा स्वच्छ व सुशिक्षित शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत सहकार्य करणारा अनेकांच्या अडचणीला धावून जाणारा एका शेतकरी कुटुंबातील युवक म्हणून ओळख असलेला चेहरा असून आपल्या मतदारसंघातून अशा स्वच्छ चारित्र्याच्या व वारकरी संप्रदायातील एका पथिकास भरघोस मताने निवडून आणणे हेच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकसंघ झाले.
योगेश काकडे यांच्या या वाटचालीमध्ये त्यांच्या प्रत्येक राजकीय प्रवासामध्ये मांजरी येथील उद्योजक प्रकाश सावंत यांच्या माध्यमातून सहकार्य लाभणार असल्याने तसेच त्यांच्या पत्नी पुष्पलता सावंत यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारासमोर जात असल्याने या सर्व गोष्टींचा दोन्ही उमेदवारांना फायदा होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या माध्यमातून ज्या योजना सर्वसामान्यांसाठी आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी या दोन उमेदवारांना आपण निवडून देणे हे आपले परम कर्तव्य असल्याचे भावना व्यक्त केली.
