दिपक खिलारे,

इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी) इंदापूर तालुक्यातील सर्व म्हणजे आठ जिल्हा परिषद व 16 पंचायत समिती जागा काँग्रेस (आय) स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेस प्रदेश सचिव सुभाष पाखरे यांनी जाहीर केले. तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.याबैठकीला काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शेळके, विनायक रणदिवे, नाशिरभाई, भिमराव शिंदे, तानाजी वायाळ आदी उपस्थित होते.

इंदापूर तालुक्यातून सन २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ४, काँग्रेस आय ३, पंचायत समितीतमध्ये काँग्रेस आय ८, राष्ट्रवादी काँग्रेस ६ असे पक्षीय बलाबल होते.त्यामुळे काँग्रेसची तालुक्यात चांगली असल्यामुळे यावेळी देखील काँग्रेस स्वबळावर

ताकदीने सर्व जागा लढवणार, जिंकणार असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *