पुणे हवेलीनामा वृत्तसमूह) शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील ग्राम महसुल अधिकारी यांच्यावर दहा हजार रुपयाची लाच मागणी व ७००० रुपये लाच स्विकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

लाच लचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार,प्रमिला नागेश वानखेडे, वय ४२ वर्षे, पद- ग्राम महसूल अधिकारी, नेम. शिरसगाव काटा (वर्ग 3). रा. फ्लॅट नंबर ४०४ तक्षशिला सोसायटी, ए विंग, पठारे ठुबे नगर, खराडी असे कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांची शिरसगाव काटा येथे वडिलोपार्जित जमीन असून ते त्यांचे वडीलांनी तोंडी वाटप करून दिलेले त्यांचे वाटणीस आलेल्या शेतीची सपाटीकरण करीत असताना त्यांचे भावाने ते काम थांबवून वाटणीप्रमाणे दप्तरी नोंद झाल्यावर तू सपाटीकरण कर व तुझा ऊसही नंतर तोडणी कर असे सांगितले होते. त्यावरून त्यांनी सदरचे काम थांबवले होते. दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी शिरसगाव काटा गावचे तलाठी ह्या तक्रारदार यांच्या शेतातील राहते घरी येऊन तुमच्या शेताचा पंचनामा करायचा आहे. तुम्ही माती विकत असल्याबाबत तक्रार आली आहे, तुम्ही तलाठी कार्यालयात येऊन भेटा असे सांगितले. त्यानंतर दिनांक १२ जानेवारी रोजी तक्रारदार हे श्रीमती वानखेडे यांचे कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली असता, त्यांनी तक्रारदार यांना तुम्ही मला १०, ०००/- रुपये द्या तुमच्या बाजूने पंचनामा करते असे म्हणून लाचेची मागणी केल्याची तक्रार ACB कडे प्राप्त झाली होती.

दिलेल्या तक्रारीचे अनुशंगाने दिनांक १६ जानेवारी रोजी तलाठी कार्यालय शिरगाव काटा येथे पडताळणी केली असता, लोकसेविका श्रीमती प्रतिभा नागेश वानखेडे यांनी तक्रारदारांचे बाजूने शेतीचा पंचनामा करणेकरिता व इथून पुढे सहकार्य करणे करिता म्हणून तडजोडी अंती ७, ०००/- रुपयाची लाच मागणी करून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले.

दिनांक १६ जानेवारी रोजी सापळा कारवाई केली असता श्रीमती प्रतिभा वानखेडे, ग्राम महसुल अधिकारी, शिरसगाव काटा यांनी तक्रारदार यांचेकडून रू. ७, ०००/- लाचेची रक्कम पंचासमक्ष छत्रपती संभाजीराजे चौक, नाव्हरा तळेगाव रोड, ता शिरुर, जिल्हा पुणे येथे स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *