पुणे (हवेलीनामा वृतसमूह) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले मतदारांमध्ये निरुत्साह यामुळे मतदानाचा टक्का घसरल्याने अनेक राजकीय पक्षांना याचा मोठा फटका बसला आहे अशावेळी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका दरम्यान उमेदवारांना आपापल्या मतदारसंघातील मतदारांना घराबाहेर काढून मतदानासाठी उद्युक्त करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अलीकडच्या काळामध्ये राजकीय पक्षांमध्ये चाललेली ओढाताण तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना दिलेली गेलेली बगड यामुळे मतदारांमध्ये वरचीवर निरुत्साह पाहावयास मिळत आहे. अनेक सुशिक्षित मतदार मतदानाकडे पाठ फिरवून मौज मजा करण्यासाठी दिलेल्या सुट्टीचा वापर करत असल्याचे दिसून येते त्यामुळे प्रत्यक्ष मतदान टक्केवारीवर याचा मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
सत्ताधारी महायुती बरोबरच विरोधी पक्षातील घटक पक्ष देखील यासाठी विशेष अशी व्यवस्था करत असल्याचे दिसून येत नाही बऱ्याच वेळेला विरोधी पक्ष हातभार झाल्याचे ही जाणवते त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्ष हा कणखर असला पाहिजे परंतु गेल्या काही कालावधीमध्ये विरोधी पक्षाने कच खाऊ धोरण राबवल्याचे दिसून येते विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये सटकून मार खाल्ल्यानंतर त्या पराभवाच्या गर्तेतून बाहेर पडल्याचे दिसून येत नाही.
मुंबई पुणे यासारख्या महानगरामध्ये देखील उच्चशिक्षित करून मतदार मतदान केंद्राकडे फिरकले नाही हे झालेल्या मतदानातून दिसून येत आहे. मुंबईतील मतदार न पडल्याने बऱ्याच निकालावर याचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले त्यामुळे पुढे होऊ घातलेले आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दरम्यान मतदारांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन मतदान केले तर निर्भेळ लोकशाही उभारणीमध्ये मोठा हातभार लागणार आहे.
