प्रवीण कांबळे,
खामगाव फाटा (हवेलीनामा प्रतिनिधी ) कासुर्डी–बोरीभडक पंचायत समिती गणात “अजित थोरात फॅक्टर” निर्णायक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आगामी राजकीय घडामोडींमुळे निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
कासुर्डी–बोरीभडक पंचायत समिती गणात राजकीय भूकंपाची जोरदार चर्चा असून तरुणांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.
कासुर्डी–बोरीभडक पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला राखीव असल्याने अजित थोरात यांनी मैदानात उतरवलेला उमेदवार निर्णायक आघाडी घेऊन आपला प्रभाव दाखवणार अशी चर्चा आहे त्या अनुषंगाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून गावोगावी, चौकाचौकात आणि राजकीय वर्तुळात एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे अजित थोरात होय.
प्रत्येक गावातील तरुण वर्गात त्यांचा दांडगा जनसंपर्क असून, लोकांच्या सुख-दुःखात धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. विकासकामांवर ठाम भूमिका, जनतेशी थेट संवाद आणि सतत सक्रिय राहणं ही त्यांची मोठी ताकद मानली जात आहे.त्यात महत्वाचे म्हणजे ते दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुल कुल यांचे अत्यंत जवळचे व विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे आगामी पंचायत समिती निवडणुकीत कुल गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता प्रबळ असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यंदा या गणात सर्वसाधारण महिला आरक्षण लागू असल्याने, अजित थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम महिला उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विरोधकांमध्येही हालचालींना वेग आला आहे. परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा अशी सर्वसामान्य नागरिकांची इच्छा असते आणि यामध्ये अजित थोरात हे नाव मोठ्या आदराने घेऊन त्यांच्याकडून या अपेक्षा पूर्ण होतील अशी मतदारांची अपेक्षा आहे त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
