थेऊर (हवेलीनामा वृत्तसंस्था) प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यांच्या गेटवर लावण्यात आलेले टेस्ट ट्यूब बेबी जाहिरात फलक यावर हवेलीनामतून वृत्त प्रसारित होतात जाहिरातदार खडबडून जागा झाला आणि ते पोस्टर ताबडतोब हटवले.
ग्रामपंचायत प्रशासन यासाठी तत्पर असणे आवश्यक असून कोणत्या प्रकारच्या जाहिराती कुठे व कोणाच्या परवानगीने लावाव्यात याबद्दल नियमावली करून घेणे आवश्यक आहे तशी नियमावली अलीकडच्या काळामध्ये अनुभवास येत नसल्याने प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अशा प्रकारच्या अवैध जाहिरात फलकांच्या जाळ्यामध्ये अडकल्याचे दिसून येते यावर स्थानिक स्वराज्य संस्था यांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे भविष्यात अशा प्रकारच्या जाहिराती होणार नाहीत याची काळजी स्थानिक प्रशासनाने घेणे आवश्यक आहे
त्याचप्रमाणे महामार्गावर अनधिकृत जाहिरात फलक महामार्गाच्या मधोमध असलेल्या दुभाजकांवर लावले जातात अनेक वेळा हे फलक रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकींना अडथळा निर्माण करतात अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे हे फलक कोणी लावले कोणाच्या परवानगीने लावले हे संबंधित प्रशासनाने नोंद करून संबंधितांना समज देऊन पर्यायाने दंडात्मक कार्यवाही करून असे प्रकार थांबवावेत अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे तसेच अवैध मोठाल्या होर्डिंग यावर पीएमआरडीए करून कारवाई करण्यात आली परंतु सर्वच अशा प्रकारचे अवैध होर्डिंग काढले गेले आहेत का याची माहिती घेऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे.
