वाघोली (हवेलीनामा वृत्तसमूह) विनापरवाना विदेशी दारुची वाहतूक करणार-या वाहनावर वाघोली पोलिसांनी कारवाई करून १६,७३,८४५/- रु. किं. ची विदेश दारुच्या बॉटल व पिकअप गाडीसह मुद्देमाल जप्त केला.
पुणे महानगरपालिका निवडणुक अनुषंगाने वरीष्ठांचे आदेशानुसार तपासपथक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैद्य धंद्यावर कारवाई चालू असताना गोष्टीवर असलेल्या पथकास वाघोली ते केसनंद रस्त्यावर एक व्यक्ती पांढरे रंगाचे पिकअप वाहनातुन विनापरवाना विदेशी दारुची वाहतुक करणार असल्याची माहिती मिळाल्याने तेथे सापळा रचून वाघोली कडुन येणारे वाहनाची पाहाणी करीत असतांना दिसले त्यावर चालकास वाहन थांबविण्याचा इशारा केला असता त्याने वाहन रोड कडेला उभे केले, वाहन चालक कपील दिगंबर शाहु वय २६ वर्षे रा लाडबावस्ती, केसनंद ता हवेली जि पुणे मुळगांव मु आंदेगाव पो वळग ता मुखेड जि नांदेड असे असल्याचे सांगीतले. पिकअप नंबर एम एच ३८ एक्स २८२२ मध्ये विनापरवाना विदेशी दारु मिळुन आली
यात १६,७३,८४५/- रु किं ची विदेश दारुच्या ७,४४१ बॉटल, ७,००,०००/- रु किंचे पिकअप नंबर एम एच ३८ एक्स २८२२ गाडी असा एकूण २३ लाख ७३ हजार ८४५/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन कारवाई करण्यात आली.
ही कामगीरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परीमंडळ ७, पुणे शहर, सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग पुणे शहर नूतन पवार, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन युवराज हांडे, यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक विनायक अहिरे, तपास पथक अधिकारी पोउपनि मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनीनाथ बोयणे, यांनी केली
