किरण खुडे

राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण असलेल्या मकरसंक्रांतीचे औचित्य साधून येथील एसटी बसस्थानकावर महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने महिला प्रवाशांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ‘तीळगुळ घ्या, गोड गोड बोला’ असा संदेश देत एसटी महामंडळाच्या महिला कर्मचाऱ्यांनी एकमेकींना व प्रवासी बांधव व महिलांना तिळगुळ वाण देऊन हा सण उत्साहात साजरा केला.

एसटी महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात परिसरातील महिला प्रवाशी सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मकरसंक्रांतीनिमित्त महिला कर्मचाऱ्यांनी प्रवासी महिलांच्या कपाळावर हळद-कुंकू लावून, स्वागत केले. एसटी बसमध्येही प्रवाशांना तिळगुळ दिले.

वरीष्ठ आगारव्यवस्थापक विद्या कदम, कनिष्ठ आगारव्यवस्थापक उज्वला कुटे, स्नेहा कातोरे, रोहीणी साबळे, स्वाती बिराजदार, पुष्पा चासकर, मनिषा सुतार, रंजना बिराजदार, विजया बगाटे आदींनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *