थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये उद्योगाचे महत्त्व अधोरेखित असून उद्योगधंद्यांसाठी आर्थिक पाठबळ तितकेच महत्त्वाचे असते यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा घटक म्हणजे मनुष्यबळ आणि या मनुष्यबळाची भूमिका साकारणारे तरुणांची हात या तरुणाईला योग्य प्रकारे व्यवसाय प्रशिक्षण व आर्थिक जोड याची सांगड करून दिली तर स्थानिक विशेषता ग्रामीण भागामध्ये व्यवसाय उभे राहून राज्यसह देशाची प्रगती होऊ शकते यासाठी आवश्यकता असते ती मदतीचे हात पुढे करण्याची प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली वीस वर्षापासून तरुणांच्या अंगातील असणारे व्यवसायाचे कौशल्य जाणून त्यांना प्रतिष्ठानच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करून आपल्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करण्यात आली.
विशेष करून स्वयंरोजगार ही संकल्पना राबवून तरुणांकडे असणाऱ्या वाहन चालक हे कौशल्य ओळखून ६० ते ७० युवकांना तीन आसनी रिक्षा विकत घेण्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देऊन यासाठी लागणारे चौथाई रक्कम प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरून त्यांना आर्थिक सहाय्य केले यामुळे अशा तरुणांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागला.
सुरेश आण्णा नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांसाठी व नवोदित उद्योजकांसाठी अर्थसहाय्य देऊन त्यांच्या व्यवसायिक प्रगतीसाठी हातभार लागला यातून सुमारे अडीचशे लहान-मोठे व्यवसाय उभे राहिले आणि यातून प्रत्येक कुटुंबाचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागला.
संस्था स्थापन झाल्यानंतर या संस्थेवर लागणारा कामगार वर्ग जवळपास 20 ते 25 बेरोजगार तरुणांना या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली.

भविष्यात थेऊर आव्हाडवाडी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये तरुण बांधवांसाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या बाबतीत योग्य तो प्लॅटफॉर्म तयार करून तरुणांमधील कौशल्य ओळखून त्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय उभा करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही उद्योजक प्रकाश सावंत यांनी दिली. व्यवसायासाठी लागणाऱ्या प्रशिक्षणाची देखील सुविधा उपलब्ध करून स्वयंरोजगार तसेच लहान मोठे उद्योग उभारण्यासाठी शासकीय व निमशासकीय ज्या आर्थिक संस्था आहेत त्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्यात येईल.
थेऊर आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटातून प्रकाश सावंत यांच्या पत्नी सौ पुष्पलता प्रकाश सावंत निवडणूक रिंगणात असून त्यांच्या माध्यमातून भविष्यात या परिसरातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी काम करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.
