अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी)
.डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, रायगड यांनी आयोजित केलेल्या विद्यापीठ स्तरावरील आविष्कार संशोधन स्पर्धेत गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवले. महाविद्यालयाच्या शैक्षणिक शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेत पुणे, कोल्हापूर, नागपूर, जळगाव, सोलापूर, मुंबई, छत्रपती संभाजी नगर या विभागातून ३०० संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून सुवर्णपदक, रौप्यपदक व कांस्यपदक मिळवले. यामध्ये अंतिम वर्ष एम. फार्मसीमधील विद्यार्थिनी शांभवी बहिर हिने ह्यूमिनिटीस, लैंग्वेजेस अँड फाईन आर्ट्स पदव्युत्तर पदवी या विभागात अंतिम वर्ष एम. फार्मसीमधील विद्यार्थिनी अनुष्का शेडगे हिने कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ पदव्युत्तर पदवी विभागामध्ये कास्यपदक प्राप्त केले. कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ विभागामध्ये महाविद्यालयाच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल चषक देऊन या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.महाविद्यालयाच्या संघाने या स्पर्धेत सर्वसाधारण उपविजेतेपद मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांना नुकतेच संस्थेचे संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप व जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप,. प्राचार्य डॉ. नागेश अलुरकर, डॉ. योगेश गुरव, डॉ. मनोज शिंदे, अविष्कार समन्वयक प्रा. स्पर्षा बांदेकर, प्रबंधक हेमंत काळे आदी उपस्थित होते. संशोधन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. स्पर्षा बांदेकर यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी अभिनंदन केले. आभार प्रबंधक हेमंत काळे यांनी मानले
