थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून नायगावं पेठ गावामध्ये हिंदुराष्ट्र जागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे श्री दीपक आगवणे आणि वारकरी संप्रदायाचे हभप तुषार चौधरी महाराज यांचे मार्गदर्शन झाले. या व्याख्यानाचा मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी हिंदू जनजागृती समितीचे श्री दीपक आगवणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की वसुधैव कुटुम्बकम म्हणणाऱ्या तसेच विश्वाच्या कल्याणाचा विचार असणाऱ्या हिंदू धर्मावरील , हिंदूंवरील आणि आपल्या भारतावरील आघातां मध्ये वाढ झाली आहे. आमच्या लाखो मंदिरांचे सरकारीकरण झाले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे हिंदूंची मंदिर संस्कृती नष्ट करण्याचे षडयंत्र सुरू आहे हिंदू धर्म आणि राष्ट्र नष्ट करण्यासाठी अर्बन नक्षलवादी कार्यरत आहेत. लव जिहादासारख्या अनेक जिहादी कारवाया सुरू असून हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण केले जात आहे. आपले राष्ट्र आपला धर्म, आपल्या मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी आपण सर्वांनी संघटित होणे ही काळाचीच नव्हे तर आपली गरज आहे. हिंदूंवरील वाढते अत्याचार पाहता रामराज्यासारखे हिंदुराष्ट्र स्थापनेचे कार्यामध्ये प्रत्येक हिंदूंनी योगदान देणे आवश्यक आहे. धर्म शिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंचा विशेषता हिंदू तरुण-तरुणींचा बुद्धिभेद करून त्यांना राष्ट्र आणि धर्माच्या विरोधात उभे केले जाते. यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षित होणे आवश्यक आहे. ज्या धर्माच्या रक्षणासाठी प्रत्येक युगामध्ये भगवंत अवतार घेतो ते दैवी धर्मकार्य करण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे आपण सुद्धा हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून चालणारे धर्मशिक्षण वर्ग आपल्या गावागावात सुरू करून आपण सुद्धा या धर्म संस्थापनेच्या कार्यात भावभक्तीने सहभागी होऊया. असे त्यांनी आवाहन केले.
अलीकडे पालकांच्या जबाबदारीत मोठी वाढ झाली असून आपल्या पाल्यांना योग्य व मूल्यवर्धित शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे आपल्या धर्मग्रंथांमध्ये दिलेल्या शिकवणीचा आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाचा वाटा आहे यासाठी तरुणांनी एकत्र येऊन लहान मुलांवर योग्य संस्कार करावेत आपल्या धर्माबद्दल त्यांच्या मनामध्ये आदर निर्माण व्हावा यासाठी दररोज त्यांच्याकडून धार्मिक पाठ करून घेणे आवश्यक आहे.
हभप तुषार चौधरी महाराज यांनी सुद्धा हिंदू जनजागृती समितीचे कार्य मोठे असून हिंदू जनजागृती समितीच्या सोबत देव देश आणि धर्मकार्यात सहभागी होण्याचे सर्वांना आवाहन केले.
या व्याख्यानाच्या स्थळी काही ग्रंथ आणि सात्विक उत्पादन याचे प्रदर्शन लावले होते उपस्थित त्यांनी या सर्वांचा लाभ घेतला.
