पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी लागणार याची उत्सुकता उमेदवारासह सर्वसामान्य नागरिकांना लागून राहिली होती आणि राज्य निवडणूक आयोगाकडून याची कोणत्या क्षणी घोषणा होणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते त्यावर राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात निवडणुकीसाठी मुदत वाढीस संदर्भात याचिका दाखल केली होती त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने केवळ पंधरा दिवसाची मुदतवाढ देऊन 15 फेब्रुवारी 2020 या तारखेपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका पूर्ण कराव्यात असे निर्देश दिले.
राज्य निवडणूक आयोग 31 जानेवारी पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करणार कसा असाच सर्वसामान्यांना प्रश्न पडला होता कारण पहिल्या टप्प्यामध्ये नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर केला या निवडणुका 15 जानेवारी रोजी होणार असून तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी घ्यायच्या हा गंभीर प्रश्न निवडणूक आयोगासमोर उभा होता यावर निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका दाखल करून यात मुदत वाढ द्यावी अशी मागणी केली त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने केवळ पंधरा दिवसाची मुदत वाढ देऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका 15 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण कराव्यात असे निर्देश दिले त्यामुळे निवडणूक आयोगाला काहीसा दिलासा मिळाल्याने या निवडणुका 15 फेब्रुवारी च्या आत पूर्ण होतील असे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अगोदरच आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम मतदारांसमोर देऊ आपणच किती योग्य उमेदवार आहोत यावर भर दिला आहे इच्छुकांची मात्र भाऊ गर्दी झाल्याने राजकीय पक्षांसमोर कोणाला तिकीट द्यावे हादेखील प्रश्न उभा ठाकणार आहे यानंतर रुसवे फुगवे पुढे येणार आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बरीच राजकीय उलथापालक अनुभवास येईल.
