पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर व पिंपरी चिंचवड येथील महानगरपालिका निवडणूक प्रतिष्ठित केली असून एनकेन प्रकारे या दोन्हीही महानगरपालिका आपल्याच ताब्यात राहाव्यात यासाठी येथे तळ ठोकून आहेत परंतु पिंपरी चिंचवड मध्ये दादांसमोर आमदार महेश लांडगे तळ ठोकून असून त्यांनी दादांना जशास तसे उत्तर दिले आहे त्यामुळे एक आमदार एक उपमुख्यमंत्री असी जोरदार लढत संपूर्ण राज्य अनुभूत असल्याचे दिसून येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात पिंपरी चिंचवड बद्दल सल असल्याचे या लढतीत दिसून येत असून यावेळी पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येक लहान गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. दररोज वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यामध्ये पिंपरी चिंचवड येथील स्थानिक आमदार महेश लांडगे यांच्यावर त्यांनी अनेक आरोप केले आणि नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले परंतु महेश लांडगे देखील तोडीस तोड उत्तर देत असून प्रत्येक आरोपात सडेतोड उत्तर देताना दिसत आहेत त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार यात शंका नाही येथील मतदार नेमका कुणाच्या पाठीशी उभा राहणार हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे केवळ प्रचाराला एकच दिवस उरलेला असल्याने प्रत्येक जण आपापली बाजू उचलून धरण्याचा प्रयत्न करीत आहे.

पिंपरी चिंचवडच्या नागरिकांचा भ्रमनिरास केला राष्ट्रवादी काँग्रेसला असता गायक अनेक वेळेला सत्ता दिली त्या पिंपरी चिंचवडकर ला फसवलं त्यांना दाखवलेलं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं नाही गेली तीस वर्षापासून आपली सत्ता होती एवढा असूनही पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी आपल्या जवळ करावं अशी आपली अपेक्षा आहे असं महेश लांडगे यांनी प्रचार सभेत सांगितले.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण महाराष्ट्राचा दादा आहोत गल्लीतल्या दादा नावे असं बोलून त्यांनी आमदार महेश लांडगे यांचा समाचार घेतला आणि महेश लांडगे यांच्या दाढीचा अंगुली निर्देश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *