थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) बिबट्याच्या दहशतीखाली असलेल्या पूर्व हवेलीतील अष्टापुर हिंगणगाव कोलवडी साष्टे यासारख्या अनेक गावांमध्ये बिबट्याने थैमान घातले असून नागरिकांबरोबर वन खात्याची ही झोप उडवली आहे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये शेती पिकाच्या देखभालीसाठी जाणेदेखील अवघड झाले असून कोणत्या वेळी बिबट्या आपल्यावर हल्ला करेल याची शक्यता सांगता येत नाही त्यामुळे नागरिक पुरते हैराण झालेले आहेत अष्टापुर परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या पशुधनावर बिबट्याकडून हल्ले होत असताना त्यांना पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात झाल्याने या परिसरामध्ये वनविभागाकडून पिंजरे लावण्यात आले गेल्या अकरा दिवसापूर्वी एक बिबट्या या पिंजऱ्यामध्ये कैद झाला त्यानंतर दुसरा बिबट्या आज केंद्रामध्ये अडकल्याचे निदर्शनास आले.

बिबट्या पिंजऱ्यामध्ये कैद झाल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरामध्ये पसरल्यानंतर त्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पिंजऱ्यामध्ये अडकलेला बिबट्या त्यांच्याकडे पाहून डार्कळ्या पडत होता दुसऱ्या बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकल्यानंतर नागरिकांनी काही प्रमाणात सुटकेचा श्वास सोडला असला तरी परिसरामध्ये असलेल्या बिबट्यांचे अस्तित्व आणखीन वाढल्याने परिसरात अजूनही बिबट्या असण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली.

एकेकाळी आंबेगाव तालुक्यामध्ये दृष्टीक्षेपात पडणारा बिबट्या हवेली शिरूर तालुक्यात देखील शेतकऱ्यांना त्रास देताना दिसून येत आहे शिरूर तालुक्यात बिबट्याने मानवावर देखील हल्ला केला आहे यामध्ये जीवित हानी देखील झाल्याचे दिसून आले त्यामुळे आपल्या लहान मुलांच्या काळजीपाई नागरिक त्रस्त झाले असल्याने शासनाकडून या बिबट्यांची कायमची उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *