थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पंचायत समितीच्या थेऊर कुंजीरवाडी आळंदी (म्हातोबा) या गणामध्ये निवडणूक प्रक्रिया प्रारंभ होण्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले असून यासाठी तीन उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया घोषित झाल्यानंतर कोणत्या पक्षाकडून कुठला उमेदवार मतदारांसमोर मत मागण्यासाठी जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरीही आपापल्या परीने या परिसरातील नागरिकांमध्ये जाऊन आपल्या कामांचा पाढा वाचताना इच्छुक गर्दी करताना दिसत आहेत.

माझी पंचायत सभापती चंद्रभागा सयाजी काकडे यांचे पुतणे तसेच हवेली तालुका अध्यक्ष सयाजी काकडे यांचे पुतणे योगेश दत्तात्रय काकडे यांनी पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपली उमेदवारी जाहीर करताना गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील प्रत्येक घटकाशी आपली जुळलेली नाळ याच्या जोरावर तसेच राजकीय पार्श्वभूमीच्या जोरावर निवडणुकीत उतरत असल्याचे दाखवून दिले.

गुरुदत्त शेती भांडार या समूहाच्या माध्यमातून पूर्व हवेलीतील अनेक गावांमध्ये शेती व्यवसायाशी संबंधित असणारे सर्व औषधी खते यांचा व्यवसाय केला जात असून या माध्यमातून परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क असल्याने या ओळखीच्या माध्यमातून तसेच शेतीविषयक असणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बांधावर जाऊन त्यांना सेवा देत अडचणी दूर केल्या त्यामुळे शेतकऱ्यांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

योगेश काकडे हे बीएससी ऍग्रो शिक्षित असल्याने शेतीच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी तत्परता दाखवतात तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात सहकार्य करण्यासाठी कायमच अग्रेसर असतात तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीचा हात नेहमीच पुढे करत असतात शिक्षणापासून वंचित कोणीही राहणार नाही यासाठी अनेक वेळा विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणीत रोख स्वरूपात मदत देण्यात नेहमीच तयार असतात.

थेऊरही जन्मभूमी असल्याने या ठिकाणी याच मातीत लहानाचे मोठे झालो आणि शिक्षण घेतले त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून थेऊर मधील चिंतामणी विद्या मंदिर येथे समकालीन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने एक लाख 11 हजार रुपयाची मदत तसेच बारीकवाडी येथील श्री स्वामी समर्थ पार्क मध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या समस्या जाणून त्यांच्यासाठी अंदाजेच खर्च दीड लाख रुपये स्वखर्चाने ड्रेनेज लाईन व चेंबरचे काम करून दिले.

अनेक वेळा रासायनिक खतांवर होत असलेली लिंकिंग संदर्भात वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करून शेतकरी व खत विक्रेते यांच्यासाठी भेटी घेऊन अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला.शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा नोंदणी कार्यक्रमांतर्गत हवेली तालुक्यातील ८३९ शेतकऱ्यांचे पिक विमा स्वखर्चाने काढून दिले. त्याचप्रमाणे दहीहंडी मंदिर उभारणी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा दिंड्यांना मोफत छत्री वाटप, फराळ तसेच महाप्रसादाची व्यवस्था गेली वीस वर्षापासून अव्यहातपणे चालू आहे, शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये संस्कारक्षमता निर्माण व्हावी यासाठी पसायदान लिखित ५००० परीक्षा पॅड वाटप केले

 

समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा तसेच ऐतिहासिक वारसा पुढील पिढीला कळावा या उद्देशाने श्रीमंत छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने छावा या महानाट्यप्रयोगाची थेऊरमध्ये आयोजन करून चित्त थरारक व छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर जिवंत देखावा सादर करण्यात आला याला थेऊर व परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *