पुणे (हवेलीनामा वृतसमूह) सासवड तथा पुरंदर तालुक्याच्या दक्षिण भागास जोडणारा महत्त्वपूर्ण असलेला मार्ग म्हणजे सासवड-कोंढवा रस्ता असून या रस्त्यावरील ‘बोपदेव घाट’ दि. ८ ते १४ जानेवारी दरम्यान वाहतुकीस पूर्णपणे बंद राहणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी अन्य मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पुरंदर आणि हवेली या दोन तालुक्यांना जोडणारा एक महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून पूर्वीपासून परिचित असलेल्या पुरंदर कोंढवा तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या सासवड शहरास पुणे शहराशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेल्या बोपदेव घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक महत्त्वाची सुचना प्रसिद्ध केली आली आहे.
लवकरच होऊ घातलेल्या पुणे ग्रँड आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या तयारी संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बोपदेव घाट ते व पुरंदर तालुक्यातील नारायणपुर या मार्गाची पाहणी केल्यानंतर त्यांच्या सुचनांनुसार बोपदेव घाटात दि.८ जानेवारी ते १४ जानेवारी दरम्यान घाट रस्त्याच्या दुरुस्तीच्या आणि विस्तारीकरणाच्या कामामुळे हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने घेतला आहे.
आगामी पुणे ग्रँड आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या अनुषंगाने बोपदेव घाटामध्ये सध्या रस्त्याचे दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कामाचा दर्जा आणि सुरक्षितता राखण्यासाठी प्रशासनाने हा मार्ग आठवडाभर बंद ठेवण्याचे निश्चित केले आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत एकेरी वाहतूकही सुरू राहणार नाही, त्यामुळे वाहनचालकांनी या मार्गाकडे येण्याचे टाळावे असे आवाहन सार्वजानिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
याच घाटमार्गे सासवडसह परिसरतील दूध, भाजीपाला आणि नोकरीनिमित्त पुणे-मुंबईला जाणारे नागरिक., बारामती, इंदापूर, फलटण या भागातून पुण्याकडे किंवा मुंबईकडे जाण्यासाठी अनेकजण पर्याय निवडतात या सर्वांवर परिणाम होणार आहे.
बोपदेव घाट रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, बोपदेव घाट बंद असल्यामुळे प्रवाशांनी दिवे घाट मार्ग, नारायणपूर मार्गे चिव्हेवाडी घाटाचा वापर करावा.
देवेन मोरे,
शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, हवेली २
