पुणे (हवेलीनामा वृतसमूह) दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणारा तसेच जबरी चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असणारा बचक्या” टोळीतील सराईत गुन्हे शाखा युनिट ६ कडून जेरबंद केला.

आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने वरीष्ठांचे आदेशान्वये पाहिजे सराईत गुन्हेगार शोधत असताना पोलीस अंमलदार नितीन मंढे यांना माहिती मिळाली की बंडगार्डन पोलीस स्टेशनला पाहिजे असलेला गुन्हेगार राजेश उर्फचौपाट्या बबलू मंगल मंडळ, वय २९ वर्ष, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, मूळ रा. दरबंगा, बिहार राज्य हा अंगुर वाईन या ठिकाणी थांबल्याची माहिती मिळाल्याने लागलीच सापळा रचुन पोलीस अंमलदार यांनी त्यास ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईकामी बंडगार्डन पो. स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

हा गुन्हेगार “चौपाटी राजा” नावाने कुप्रसिद्ध असुन दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मोबाईल चोरी करणारी सराईत “बचक्या” टोळीशी संबंधीत असुन सध्या तो मोक्का गुन्ह्यात जामिनावर होता.

त्याच्यावर १) बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. ८१/२०१३, भा.द.वि.क. ३७९, २) बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. २५९/२०१३, भा.द.वि.क. ३२६,३२३,५०४,५०६, ३) बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. २२४/२०१४, भा.द.वि.क. ३७९,५११,३४ ४) बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. ५८/२०१६, भा.द.वि.क. ३७९.३४ ५) बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. २४४/२०१७, भा.द.वि.क. ३२४, ३५४(अ), ५०६ ६) बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. १४३/२०२१, भा.द.वि.क. ३९५,३९७,३२३,५०६ ७) लष्कर पो.स्टे. गु.र.नं. १९२/२०१७, भा.द.वि.क. ३२४,३२३,५०४,३४ ८) विश्रामबाग पो.स्टे. गु.र.नं. ३३७/२०११, भा.द.वि.क. ४६०,३४ गुन्हे नोंद आहेत.

ही कामगीरी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण युनिट ६ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ कडील सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, कॉप्स २४ मार्शल अंमलदार तुळशीदास जाधव व महेंद्र आगळे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे व सोनाली नरवडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *