पुणे (हवेलीनामा वृतसमूह) दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने विजयस्तंभ कार्यक्रमाचे नियोजन चोखपणे करण्यात आले होते, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी सर्व जिल्हास्तरीय विभागप्रमुख , सर्व नोडल अधिकारी , हवेली व शिरूर तालुक्याचे गटविकास अधिकारी व त्यांचे सर्व तालुकास्तरीय विभागप्रमुख , विस्तार अधिकारी , कर्मचारी यांच्यासह समक्ष पेरणे कार्यक्षेत्रत भेट देऊन सर्व लहानमोठया गोष्टींचे निरीक्षण करून स्तंभ परिसरात सर्व अधीकारी कर्मचाऱ्यांच्या ६ बैठका घेतल्या . सर्व बाबींवर चर्चा करून मार्गदर्शन केले परिणामी हा सोहळा अतिशय यशस्वी झाला .

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रामचंद्र हंकारे यांच्या नेतुत्वाखाली अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिपक सांळुखे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश गोरे यांनी पुर्णपणे या कार्यक्रमाचा सूक्ष्म कृती आराखडा तयार केला व त्याची काटकोरपणे सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी अंमलबजावणी केली त्यामुळे मोठ्या संख्येने आलेल्या अनुयायांच्या जनसमुदायास आरोग्य सेवा देणे शक्य झाले . यामध्ये १३६ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २३ आरोग्य बुथ मधुन सेवा दिली . या करीता ३३ ऍडव्हान्स व बेसिक रुग्णवाहिका कार्यक्रम स्थळी सज्ज ठेवल्या होत्या . आपत्कालीन प्रसंगासाठी ९ खाजगी रुणालयातून १२१ बेड आरक्षित करण्यात आले होते .

सर्वात विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषद व तालुका आरोग्य विभागाने अतिशय कमी कालावधीत स्तंभाच्या शेजारी ३ बेडचे ICU उभारले होते ज्या मधुन ११० रुग्णांना तातडीची सेवा दिली आणि ५ रुग्णांना संदर्भ सेवा देवुन त्यांचे प्राण वाचविण्यात आले . एकुण ६२६८ रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. यामुळे एकाच वेळी लाखोंचा जनसमुदाय असुनही योग्य नियोजनामुळे एकही अनर्थ घडला नाही हे खरे जिल्हा प्रशासनाचे यश आहे .

याव्यतिरिक्त १४६ पिण्याच्या पाण्याचे टँकरचे शुद्धीकरण आरोग्य विभागामार्फत करण्यात आले . तसेच डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ५ दिवस अगोदरच किटक शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येऊन धूर फवारणी देखील करण्यात आली होती. याकामी गट विकास अधिकारी शेखर शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग्रामपंचायतींनीही मोलाचे सहकार्य केले .

अशाप्रकारे सर्वच विभागांनी एकमेकांशी संपर्क ठेवून ही आरोग्य मोहीम यशस्वी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *