पुणे (हवेलीनामा वृतसमूह) नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र दुमधाम चालू असते वेगवेगळ्या कार्यक्रमाची मेजवानी तसेच खवय्या ची देखील धमाल चालू असते मात्र यावर्षी 31 डिसेंबर रोजी एकादशी आल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे. तसे मांसाहारी लोकांना एकादशीचे वावडे असणे अशक्य परंतु गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय संस्कृतीची बीजे खोलवर रुचलेली दिसत आहेत त्यामुळे नकळतच सर्वसामान्यांच्या मनावर याचा पकडा निर्माण झाल्याचे दिसून येते.
इंग्रजी कालगणनेनुसार नववर्षाची सुरुवात एक जानेवारी रोजी होते गेली कित्येक वर्षांपासून भारतीय मनावर नववर्षाची सुरुवात ही एक जानेवारी रोजीच करण्याचा पायंडा पडला त्यामुळे 31 डिसेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या पार्ट्या आयोजित केल्या जातात विशेष करून या पार्ट्या ओल्या – सुक्या असतातच आणि त्यामुळे त्यांचा हा आनंद द्विगुणीत होत असतो परंतु यावर्षी 31 डिसेंबर रोजी पौष महिन्यातील एकादशी आल्यामुळे शौकिनांवर अडचण आल्याचे बोलले जाते यावर शकल लढवत ही नववर्षाची पार्टी एक दिवस अगोदर म्हणजेच 30 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे दिसून येते.
