थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना राबवली जात असून यामध्ये लोकाभिमुख वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत यामध्ये राज्यातील जवळपास सर्वच ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवला असून नागरिकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत यात नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून यासाठी वेगवेगळी मोहिमा राबविल्या जात आहेत अशाच पैकी ग्रामपंचायतीस मिळणाऱ्या मालमत्ता कराच्या थकबाकी मध्ये 50% सवलत संपूर्ण राज्यात लागू केली असून ग्रामपंचायतीने यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन नागरिकांना या सुविधेचा लाभ घ्यावा असे सुचविण्यात आले यासाठी बहुतांश ग्रामपंचायत तिने असे ठराव मंजूर करून ग्रामस्थांना 31 डिसेंबर पूर्वी थकीत घरपट्टी मध्ये 50% सवलत देऊन चालू वर्षाची संपूर्ण घरपट्टी एक रकमे भरून सवलत देण्याचे ठराव मंजूर केले परंतु पुणे सोलापूर महामार्गावरील पुणे शहरालगत असणारी मोठ्या लोकसंख्येची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या उरुळी कांचन येथील ग्रामपंचायत ग्रामपंचायत तिने या ठरावास विरोध करून तो ठराव ना मंजूर केला याची नागरिकांना कसलीच माहिती झाली नाही प्रसिद्धीही दिल्यामुळे नागरिकांमध्ये मोठे नाराजी उत्पन्न झाली यावर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन यांनी जोरदार आवाज उठवून ग्रामस्थांच्या सहीचे एक पत्र ग्रामपंचायत देऊन विशेष ग्रामसभा बदलण्याचे मागणी केली यावर आज दिनांक 29 रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली यावेळी मोठ्या गोंधळाच्या वातावरणात सवलतीचे प्रस्ताव मंजूर करून ग्रामस्थांना सवलत योजना लागू केली.

सवलत योजना लागू करतात या सवलतीचा फायदा घेण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती यातून मोठा महसूल ग्रामपंचायतीस मिळणार असल्याने उत्पन्नात कोट्यावधी रुपये गोळा होणार आहेत.केवळ दोनच दिवस शिल्लक राहिल्यामुळे नागरिकांनी मोठया रांगा लावल्याची माहिती मिळत आहे.

नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन यांनी हा ठराव नामंजूर करण्यामागे नेमका उद्देश काय असावा हे समजत नसल्याचे स्पष्ट केले परंतु लवकरच ग्रामपंचायतच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत अशा वेळी ज्यांनी या सवलतीच्या ठरावास विरोध केला ते मतदारांसमोर काय भूमिका घेऊन जाणार आणि मत मागणार असा प्रश्न उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *