दिपक खिलारे,
इंदापूर( हवेलीनामा प्रतिनिधी ) इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव येथील सरपंच,ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ गटविकास अधिकारी इंदापूर कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले त्यांच्या या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती याविषयी “हवेलीनामा” मध्ये याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी संजय जगताप इंदापूर यांनी या कारभारात समाविष्ट असलेल्या बांधकाम विभागासह पाणीपुरवठा विभागात तसेच विस्तार अधिकारी यांना उद्या दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
बाभूळगाव चे ग्रामस्थ अमोल इंगळे, गणेश भोसले, सागर आसबे हे इंदापूर येथील गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दिनांक 26 डिसेंबर पासून उपोषणास बसले होते त्यांनी गावातील ग्रामपंचायत मध्ये चालू असलेल्या मनमानी कारभार विरोधात चौकशी करावी अशी मागणी केली होती या अनुषंगाने इंदापूर चे सहाय्यक गटविकास अधिकारी जगताप यांनी प्रशांत गावडे उपअभियंता पाणीपुरवठा पंचायत समिती इंदापूर तसेच वसंत शेंडे शाखा अभियंता बांधकाम विभाग इंदापूर आणि विस्तार अधिकारी बी डी काळे यांना उद्या दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता बाभुळगाव ग्रामपंचायत येथे चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले असून पुढील पंधरा दिवसात अहवाल कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत या पत्रानंतर उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले.
