अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी).आज संपूर्ण जगात भारत देशाचे दरडोई उत्पन्न हे कमी आहे .आज आपण 25 पट उत्पादन शेतीतून कमी घेतो आहे .कोणतेही पीक असू दे ,त्या शेतातील साधन संपत्तीचा योग्य उपयोग आणि वापर करताना आपण शेती गरिबीतून श्रीमंतीकडे कशी नेऊन समृद्ध करता येईल हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करणे शक्य होईल यासाठी ही शेती व जीवनात यशस्वी होण्यासाठी सतत नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिकतेचा शोध घ्या ,अभ्यास करा. असे आवाहन जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांनी केले.
सातारा येथील रा.ना.गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा 35 वा सातारा भूषण पुरस्कार, 2025 हा भारतातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांना सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ शास्त्रज्ञ व विचारवंत दत्तप्रसाद दाभोलकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी डॉ . ज्येष्ठराज जोशी यांनी वरील उद्गार काढले. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील ,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के, कराड येथील विठामाता विद्यालयाच्या माजी शिक्षिका सौ. प्रतिभाताई ताम्हणकर तसेच गोडबोले चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अशोक गोडबोले व डॉ.अच्युत गोडबोले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती .
या कार्यक्रमाच्या प्रारंभी नुकतेच निवडलेले जेष्ठ करसल्लागार व मार्गदर्शक स्वर्गीय अरुणराव गोडबोले व त्यांच्या भगिनी स्वर्गीय शारदा शिंत्रे यांना श्रद्धांजली वाहून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आपल्या प्रास्ताविक भाषणात ट्रस्टचे विश्वस्त डॉ.अच्युत गोडबोले बोलताना म्हणाले की, सन 1991 पासून हा पुरस्कार देण्यास प्रारंभ झाला .प्रथम पुरस्कार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर अनेक नामवंत असे समाजाला योगदान देणारे विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देण्यास प्रारंभ झाला .यावर्षी निवड झालेले पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांची निवड ही स्वर्गीय अरुणराव गोडबोले यांनीच केली होती .आज गेली 55 वर्षे ज्ञानदानाचे काम एक तपस्वी योग्य प्रमाणे करत पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांनी दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना पीएचडी चे शिक्षण व मार्गदर्शन केले आहे. व्ही .डी .सी .टी. यासोबत मुंबईचे विद्यापीठ येथे शिक्षक व प्राध्यापकांना तसेच होमी भाभा इन्स्टिट्यूट मध्येही डीन म्हणून काम पाहत आज पर्यंत पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांनी देशात, परदेशातअनेक व्याख्याने दिलेली आहेत. अनेक नामवंत पुरस्कार मिळालेल्या पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांना 2014 पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आल्यानंतर मसूरच्या ग्रामस्थांनी आपल्या माणसाचे झालेले कौतुक पाहून त्यांचा हत्तीवरून स्वागत मिरवणूक काढली होती .आज त्यांची पुढील पिढीही कर्तुत्ववान असे भटनागर पुरस्काराचे मानकरी असून डॉ.ज्येष्ठराज जोशी यांच्या या निवडीबद्दल ट्रस्टला विशेष आनंद होत आहे. याप्रसंगी रामनामी शाल ,चाळीस हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, मानपत्र व पेढ्यांचा हार घालून डॉ.ज्येष्ठराज जोशी यांना सातारा भूषण पुरस्कार डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .याप्रसंगी मसूर ग्रामस्थ समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ व विविध संस्थांच्या वतीने ज्येष्ठराज जोशी यांचा विशेष सत्कारही करण्यात आला .
सत्काराला उत्तर देताना जोशी म्हणाले की .ज्या पुरस्कारात सातारा आणि जेथे हा पुरस्कार मी कर्मवीरांच्या भूमीत घेतो आहे त्यात दोघांचेही योगदान मोठे आहे व मोठे होण्याची संधी मला यामुळेच मिळाली. सातारचा मोठा अभिमान आमच्या कुटुंबाला आहे .संशोधन करण्यासाठी खूप पैसा ,अध्यायावत प्रयोगशाळा ,व्यापक इंटरनेट ,वाचनालय व चांगले विद्यार्थी लागतात हे सर्व खोटे आहे .चांगल्या संशोधनासाठी यातली काहीही लागत नाही. मनाची एकाग्रतेची शक्ती विविध कारणांनी विचलित होते. आपण तक्रारी सांगत राहतो ,ते सोडून दिले पाहिजे .
आपला देश गरीब आहे ,आपले दरडोई उत्पन्न कमी आहे .शेती आईकडे आपले दुर्लक्ष होत आहे .इंडस्ट्रियल व शेती उद्योगात आपण गरीब असलो तरी बाहेर देशातून भरपूर मागवत आहोत .आपण आज देशात वीस पट टोमॅटो कमी पिकवतोय .चिलखत ,कच्चे तेल, खाद्यतेल आपण मोठ्या प्रमाणात परदेशातून मागवतो. औद्योगिक व शेतीतून कमी पैसे मिळवून आपण ते दुसऱ्यांना देत आहोत .नवीन खत कारखान्यासाठी सुद्धा बाहेरूनच पाच हजार पट पैसे देऊन आपण ते उभारत आहोत. एका बाजूला आपण एकत्र येऊन जगाच्या उत्पन्नात वाढ करत आहोत .आपण आजही दोन पट ते वीस पट कमी उत्पादन करतो आहे. शेतीतील टाकाऊ वस्तूंचा उपयोग अभ्यासातून आपण बायोगॅस ,लिक्विड व चारकोल निर्मिती करून करू शकतो. ज्यातून आपल्याला अतिशय चांगले फायदेशीर उत्पादन व कमाई करू शकतो .नॅनो टेक्नॉलॉजीतील नॅनो युरिया,नॅनो पोटॅश, नॅनो फॉस्फरस हे टेक्निक डेव्हलप केले तर 50 टक्के उत्पादनात वाढ मिळाली आणि एवढेच नव्हे तर 50% पेक्षा 300 पट वाढ मिळाल्याचे मी उदाहरण स्वतः पाहिले आहे. कारखाना उभारण्यासाठी 30 कोटी खर्च अपेक्षित असताना तेवढाच फायदा दरवर्षी त्या कारखान्यातून काढता येईल ,आणि याच संकल्पनेतून मी मसूर येथे असा नवा प्रकल्प भारत आहे .ध्येय सोपे नसले तरी नवीन पिढीने प्रश्न तयार करावेत व आपले उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करावा .यशस्वी होण्यासाठी शिकत रहा, नवनवीन तंत्रज्ञान जवळ करा .आज बांबू शेतीतूनही खूप मोठा फायदा उपलब्ध होऊ शकतो याचा विचार आवश्यक शेतकऱ्यांनी करणे जरुरीचे आहे.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत व शास्त्रज्ञ डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर म्हणाले की ,आनंददायी, प्रेरणादायी आणि सांस्कृतिक असा हा सोहळा साजरा होताना आज कारुण्याची झालर ही प्राप्त झाली आहे .स्वर्गीय अरुण याची आठवण होताना 35 वर्षांपूर्वी सुरू केलेला हा पुरस्कार सोहळा आता हा संपूर्ण राज्यालाच नव्हे तर देशातील प्रत्येक जिल्ह्यात घडविणारा उपक्रम म्हणून पथदर्शक झाला आहे ,याचा आनंद वाटतो .पुरस्कार देताना धर्म ,जात ,विचारधारा, याचा विचार कधीही केला गेला नाही. समाजाला उपयोगी व्यक्तीला निवडून हे पुरस्कार देण्याची ही परंपरा खरोखरच कौतुकास पात्र ठरणारी आहे. प्रथम पुरस्कारसाठी निवडले गेलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्यानंतर 17 वर्षांनी पुरस्कार मिळवणारे शरद जोशी व आता 35 व्या वर्षी निवड झालेले ज्येष्ठराज जोशी हे तीन जोशी हे खरोखरच मोठे कर्तुत्ववान आहेत. पहिल्या दोघांची ओळख आपणाला आहे .मात्र ज्येष्ठराज जोशी यांचे विज्ञानातील अलौकिक कर्तुत्व आपणाला माहीत नाही. माणूस किती जमिनीशी जपला जाऊ शकतो हे उदाहरण पाहता सबंध गावाने जोशी यांची काढलेली मिरवणूक ही विलक्षण आहे .आपण पाहत असलेले बटू वामनाचे हे तिसरे पाऊल खरोखरच जागतिक सन्मान मिळवणाऱ्या दर्जाचे आहे .जोशी सरांचे संशोधन हे अतिशय महत्त्वाचे आहे. आज स्वर्गीय प्रा. नरगुंद सरांनंतर ज्येष्ठराज जोशी सरांना असलेली प्रगल्भ माहिती व त्यांच्या ज्ञानाचा वापर यातूनच त्यांना मिळालेला हा सन्मान हा गौरवपूर्ण व अभिमानाचा वाटतो .आणि आजवर सातारा भूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्व जोशींचे सत्कार ही उंची गाठणारे आहेत .जेथे हा पुरस्कार दिला जातो, त्यानंतर या सर्वांनाच देश पातळीवरचे पुरस्कार मिळाल्याची परंपरा आहे ही खरोखरच गौरवपूर्ण आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रद्युम्न गोडबोले यांनी केले .या कार्यक्रमास गोडबोले परिवारातील सौ .अंजली गोडबोले, डॉ. अनुराधा गोडबोले ,डॉ. चैतन्य गोडबोले, उदयन गोडबोले ,आर्यन गोडबोले तसेच श्रीराम नानल, डॉ. अजित पाटील, डॉ. गायकवाड .जेष्ठ पत्रकार मधू नेने डॉ धनंजय बोधे.संदेश शहा. बाळासाहेब कुलकर्णी .दिलीप पाठक,विनोद झंवर, भालचंद्र जोशी. श्रीकांत कात्रे .गौतम भोसले. श्रीकांत शेटे .अनिल काटदरे, पराग काटदरे, जोशी परिवाराचे कुटुंबातील सदस्य मसूर गावचे ग्रामस्थ यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
