थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) राज्य शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री ग्राम समृद्ध सवलत योजनेस संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतीने लागू केलेल्या सवलतीचा फायदा नागरिकांना मिळत असून थकबाकी वरील घरपट्टीत 50 टक्के सवलत मिळत असल्याने नागरिकांनी ग्रामपंचायत मध्ये ही घरपट्टी भरण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. ही योजना 31 डिसेंबर पर्यंत लागू करण्यात आल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील ग्रामपंचायत कार्यालयात घरपट्टी भरून घेण्यासाठी कार्यालय चालू ठेवण्यात आले होते येऊन येथील कार्यालयात लिपिक घरपट्टी भरुन घेत असताना दिसून येत होते.

डिसेंबर महिन्यामध्ये ही योजना लागू झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ झाली असेल तर थकीत घरपट्टी मोठ्या प्रमाणावर वसूल होत आहे. पूर्व हवेलीतील अनेक ग्रामपंचायतीचा आढावा घेतला असता हे चित्र दिसून येत आहे ग्रामपंचायत कार्यालयाकडून ग्रामस्थांना आवाहन करण्यात येत असून गावांमध्ये सूचना गाडी फिरत आहे.

थेऊरचे ग्राम अधिकारी तुकाराम पाटील यांनी सांगितले की या योजनेला ग्रामस्थांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून ग्रामस्थ आपली थकीत घरपट्टी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत कार्यालयात येत आहेत अनेक नागरिकांनी याबद्दल चौकशी केलेली असून 31 डिसेंबर पर्यंत थकीत घरपट्टीपैकी अनेक जण या संधीचा फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे.

यापूर्वी अनेक गावांमध्ये घरपट्टी केवळ निवडणूक प्रक्रिया चालू झाल्यानंतर जमा होत असे. परंतु राज्य शासनाने काढलेल्या या विशेष मोहिमेमुळे थकीत घरपट्टी वसूल होण्यासाठी चांगली मदत मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *