अतुल देशपांडे,

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) सातारा नगरपालिकेच्या हद्दवाढी भागातून निवडून आलेल्या एका अपक्ष उमेदवारावर खासदार गटातून मंत्री गटात गेल्यामुळे गावकी आणि भावकी प्रकाराच्या पोस्टवर सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने निवडून आलेल्या या अपक्ष नगरसेवकाला अघोषित वाळीत टाकण्याचा धक्कादायक प्रकार? होत असल्याची चर्चा सातारा शहरात सुरू झाली आहे. तसेच भाजपचा खासदार गटातील कार्यकर्त्यांकडून भाजपच्याच नगरसेवक पदाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी याच अपक्ष उमेदवाराला मदत केली असल्याचाही प्रकार उघड झाला आहे.

सातारा नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राजे गट एकत्र येत भाजपच्या झेंड्याखाली निवडणूक लढवून सातारा नगरपालिकेचे सत्ता मिळवली. आजच नगराध्यक्षांनी सातारा नगरपालिकेचा पदभार स्वीकारला यावेळी दोन्ही राजेंनी भाजप पक्ष चिन्हावर निवडून आलेले आणि बंडखोरी करत अपक्ष नगरसेवक निवडून आलेले हे सगळे भाजपचेच असल्याचे सांगत सर्वांनी एक दिलाने काम करा अशा सूचनाही केल्या, निवडणुका झाल्या आहेत प्रभागात विकास कामे करताना कोणताही वाद-विवाद न करता कामकाज करा असा कानमंत्र देत कानपिचक्याही दिल्या. परंतु कार्यक्रम सोहळा सरपंच चार-पाच तास उलटले नसतील तोवर हद्दवाढीतील अपक्ष नगरसेवकाच्या विरोधात सोशल मीडियावर खासदार गटाकडून मंत्री गटाकडे गेल्यामुळे ना गावकी ना भाऊकी बरोबर असा पोस्ट तयार करून शहरभर फिरवल्या जात आहेत. केवळ खासदार गटाकडून मंत्री गटाकडे गेल्यामुळे या अपक्ष उमेदवाराला अघोषित वाळीत टाकण्याचा प्रकार तर चालू झाला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

तसेच या व्हायरल पोस्टमध्ये भाजपचा खासदार गटाच्या कार्यकर्त्यांकडून या अपक्ष उमेदवाराला रसद पोचवून निवडून आणले गेले असल्याचे या पोस्ट मधून दिसून येत आहे. त्यामुळे भाजपच्या चिन्हावर उभ्या राहिलेल्या नगरसेवक पदाच्या उमेदवारालाच खासदार गटाच्या कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी कार्यवाही करत पाडला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

असेच प्रकार अन्य काही प्रभागात झालेत का असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या सर्व बाबींवर भाजपच्या वरिष्ठ स्तरावरील नेते काय निर्णय घेणार याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

*कोणी कोणत्या पक्षात जावे कोणी कोणत्या गटात जावे हे ठरवण्याचा अधिकार कोणत्याही व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय असतो. अनेक नेतेमंडळी निवडणुका आल्या की पक्ष बदलत असतात.मग कार्यकर्ते त्यांनाही वाळीत टाकणार का? हद्दवाढी मधील हा नगरसेवक या गटातून त्या गटाकडे गेल्यामुळे जर कोणी गावकी भाऊकी करत अघोषित वाळीत टाकण्याचा प्रकार करत असेल तर तो कायद्याने गंभीर गुन्हा आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *