पुणे (हवेलीनामा विशेष बातमीपत्र) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना राज्यभरांमध्ये प्रचाराचा धुरळा उडत आहे अशातच विरोधी पक्ष म्हणून जी महाविकास आघाडी राज्यात काम करत आहे त्यांनी मात्र पहिल्या टप्प्याकडे सपसेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येते अशावेळी दुसऱ्या टप्प्यामध्ये होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये ही विरोधी पक्ष महाविकास आघाडी आपले अस्तित्व दाखवणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने राज्यातील सत्तारूढ महायुतीला धोबीपछाड दिल्यानंतर खडबडून जागी झालेली महायुती संपूर्ण राज्यात आपण केलेल्या वेगवेगळ्या विकास कामांचा झेंडा घेऊन चौफेर स्वार झाल्यानंतर मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांचा पुरता पाडाव करून राज्यामध्ये निर्विवाद बहुमत घेऊन सत्तारूढ झाली त्यानंतर मात्र विरोधी भूमिका घेणारी महाविकास आघाडी जर्जर करण्यात महायुतीला मोठे यश आलेले दिसून येते.
दुसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांचा पक्ष यांच्यातील मनोमिलन झाल्यानंतर मुंबईसह पुणे नाशिक आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये महायुतीला टक्कर देण्यासाठी नक्कीच आव्हानात्मक काम या ठिकाणी होणार असल्याचे दिसून येते त्यामुळे सत्तारूढ पक्ष जसा एक हाती सत्ता मिळवण्यासाठी एकतर्फी विजय घोडदोड करताना दिसत होता याला कुठेतरी लगाम लावण्यात इतपत विरोधक सक्षम होताना दिसत आहेत परंतु महायुतीतील इतर घटक पक्ष मात्र या निवडणूक प्रक्रियेमध्ये फार मोठी भूमिका बजावताना दिसत नाहीयेत त्यामुळे येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीबरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये हा विरोधी पक्ष आपली ताकद कितपत दाखवेल हा येणारा काळच ठरवेल.
