पुणे (हवेलीनामा वृतसमूह) गेला दहा वीस दिवसांपासून पुणे शहराच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्विस्ट पाहायला मिळाले यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले यामध्ये शरद पवार गटाचे सच्चे कार्यकर्ते म्हणून परिचित असणारे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र या दोन्हीही गटांना एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत आपली वेगळी भूमिका स्पष्ट केल्यानंतर गेल्या काही कालावधीत ही दोन्ही गटांची होती स्पष्ट होत असल्याने त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदासह सदस्यत्वाचाही राजीनामा देऊन या प्रक्रियेतून स्वतःला दूर केले परंतु येत्या महानगरपालिका निवडणुकीत आपण निवडणुकीत असणार परंतु ही निवडणूक अपक्ष म्हणून लढणार की एखाद्या अधिकृत पक्षांच्या बाजूने लढणारे ही भूमिका आणखी त्यांनी स्पष्ट केली नाही.
“गेल्या दहा-वीस दिवसांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. पक्ष निवडणूक कशी लढवेल त्या संदर्भात आम्ही सगळ्यांनी अगोदर ठरवलं होते. जाहीरनामा देखील तयार केलेला होता. या सगळ्या गोष्टी होत असताना बऱ्याच राजकीय अफवांना उधाण आलं होतं. त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता थोडा व्यथित झाला होता”, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली
आपण नेमकी काय भूमिका घ्यायची? आपला प्रवास कसा असेल? याबाबत माझ्या मनात प्रचंड गोंधळ सुरु होती. परंतु जास्त वेळ यात राहू नये. कारण मी कुठलाही व्यसनाधीन माणूस नाही, ज्यामुळे मी हा गोंधळ थांबवू शकतो. त्यामुळे हे द्वंद्व बराच काळ न ठेवता, मी सर्वांचा आदर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा शहराध्यक्ष पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे”, अशी माहिती जगताप यांनी दिली.
