थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) यशवंतराव चव्हाण कलाक्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत सन २०२५ -२६ पुणे जिल्हा परिषद व तालुका हवेली आयोजित कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन येथे करण्यात आले होते.

यामध्ये विविध प्रकारच्या २३ स्पर्धा पार पाडल्या हवेली तालुक्यातून प्रथम क्रमांकाने विजेते झालेले संघ आणि वैयक्तिक स्पर्धेचे स्पर्धक मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत सहभागी झाले. खो खो, कबड्डी, लंगडी, आट्यापाट्या, बेडूक उड्या, धावणे, उंच उडी, लांब उडी, मल्लखांब, लेझीम अशा प्रकारच्या स्पर्धा लहान गट व मोठा गट (मुले आणि मुली) प्रकारात पार पडल्या. सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने आनंदाने कार्यक्रमात सहभागी झाले होते त्याचबरोबर तालुक्यातील सर्व मार्गदर्शक शिक्षक क्रीडा शिक्षक उपस्थित होते पर्यवेक्षक यंत्रणेमध्ये माध्यमिक विभागाने आणि विनाअनुदानित शाळांच्या क्रीडा शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोकनृत्यासाठी तज्ञ शिक्षिका जोशी मॅडम,चोरगे मॅडम आणि रेवती मॅडम यांनी उत्तम सहकार्य केले.
कार्यक्रमाला पंचायत समिती हवेलीचे गटशिक्षणाधिकारी हेमंत कुमार खाडे तसेच विस्तार अधिकारी निलेश धानापुणे आणि ज्ञानदेव खोसे हे उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जयप्रकाश बेदरे आणि हवेली तालुक्याच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर उपस्थित होते त्याचबरोबर प्राचार्य भोसले सर आणि उपप्राचार्य काशीद सर पर्यवेक्षक सौ संगीता कुंभार महात्मा गांधी विद्यालय, जगदाळे सर, अमोल बेदरे, योगेश काळे, शिक्षक संघटनेचे नेते राजेश काळभोर, महिला आघाडी राज्य अध्यक्ष अनुराधा तकटे हवेलीचे माजी अध्यक्ष रमेश कुंजीर हवेली तालुका चे विद्यमान अध्यक्ष जयवंत मोहिते, हवेली तालुक्याच्या महिला आघाडी अध्यक्ष सारिका ताटे, महात्मा गांधी विद्यालयाचे क्रीडा प्रमुख टिळेकर, जगताप, शिंदे आणि त्यांची सर्व पथक सर्व केंद्रप्रमुख आणि शिंदवणे केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमात सहभागी 700 विद्यार्थ्यांसाठी जेवणाची सोय उरुळी कांचन माजी उपसरपंच मयूर कांचन , प्रथम क्रमांकासाठी बक्षीस जयप्रकाश बेद्रे जे बी सराफ ज्वेलर्स उरुळी कांचन, द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस नायगाव पेठ आदर्श सरपंच सुरज चौधरी, तृतीय क्रमांकासाठी माजी उपसरपंच बक्षीस जितेंद्र बडेकर यांच्या वतीने देण्यात आली.कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी सागर कांचन आणि त्यांचे मित्रपरिवार हे देखील उपस्थित होते सर्व स्पर्धा पार पाडल्यानंतर विद्यार्थ्यांचा बक्षीस चा समारंभ पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा शेख आणि युवराज ताटे यांनी केले.महात्मा गांधी विद्यालया च्या क्रीडा शिक्षक, आबा सुतार आणि शिंदवणे केंद्रातील सर्व शिक्षकांच्या सहकार्याने सर्व स्पर्धा उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात पार पडल्या सदर कार्यक्रमांमध्ये गटशिक्षण अधिकाऱ्यांनी स्वतः सर्व स्पर्धांचे निरीक्षण केले, विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले त्यांच्या प्रोत्साहनाने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य संचारले होते. विद्यार्थ्यांमध्ये रमणारे गटशिक्षणाधिकारी अशी सर्वांमध्ये प्रतिमा असणारे गटशिक्षणाधिकारी हेमंत कुमार खाडे यांनी सर्व विजेत्या स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा देऊन तसेच प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.
