थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) उद्यान विद्या जागरूकता आणि औद्योगिक कार्य अनुभव कार्यक्रम अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय पुणे येथील उद्यानविद्या कन्यांनी जागतिक मृदा दिन या कार्यक्रमाचे आयोजन केले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता थेऊर येथील एका प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतात “मृदा पूजनाने” झाली. उद्यान विद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सुरुवातीला उपस्थित शेतकऱ्यांना “मृदा दिनाचे” महत्त्व आणि जमिनीचे बिघडलेले आरोग्य याबाबत माहिती दिली.तसेच कार्यक्रमाचा महत्त्वाचा विषय म्हणजे निरोगी शहरांसाठी निरोगी माती याचे देखील महत्त्व दर्शवले.

पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी मातीचे परीक्षण किती महत्त्वाचे आहे हे सांगताना विद्यार्थिनीं यांनी मातीचा नमुना कसा घ्यावा याचे प्रात्यक्षिक दाखवले.शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचा नमुना परीक्षणासाठी जमा केला. मातीचे नमुने जमा करण्यात आले असून लवकरच त्यांची मृदापत्रिका तयार करण्यात येणार आहे. पिकांच्या योग्य वाढीसाठी व अपेक्षित उत्पादनासाठी खतांचा योग्य प्रमाणात संतुलित व कार्यक्षम वापर कसा करावा याबद्दलही मार्गदर्शक केले. यामुळे शेतकऱ्यांना अन्यद्रव्यांची माहिती, जमिनीचे आरोग्य अशा बऱ्याच मुद्द्यांवर शेतकऱ्यांना माहिती समजली.

कार्यक्रमाचे आयोजन उद्यानविद्याकन्या सलोनी माने ,सीमा मुंढे ,ऋतुजा नाखले ,नम्रता नाळे ,ऋतुजा नामदास ,प्रगती परभत, सानिका पाटील, हर्षदा शिंदे ,प्रियंका शिंदे ,आर्या सूर्यवंशी ,वैष्णवी वंजारी यांनी केले.

यावेळी गावचे सरपंच शितल शरद काकडे ,उपसरपंच आप्पासाहेब काळे ,सहाय्यक कृषी अधिकारी पी .एस .जाधव आणि कृषी मित्र विजय कुंजीर, नंदकुमार कुंजीर हे देखील उपस्थित राहिले.

या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालय पुणे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, सहयोगी संशोधन संचालक गणेश खिंड पुणे तथा केंद्रप्रमुक डॉ. सुभाष भालेकर आणि सहाय्यक प्राध्यापक मृदा शास्त्र उद्यान विद्या महाविद्यालय पुणे तथा कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रद्धा वाबळे आणि डॉ. सुनील जोगदंड यांचेही मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *