सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) :न्यायालयाच्या आदेशानंतर फलटण पालिकेची निवडणूक नक्रिया लांबणीवर गेली आहे. त्यामुळे सव्याने निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आल्याने आता प्रचाराने चांगलाच वेग बेतला आहे. सर्वच पक्षांचे नेते आणि डमेदवार यांनी प्रभागातील गल्लोगल्ली नाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी आणि कोपरा सभांचा सपाटा लावला आहे. दरम्यान, केलेल्या कामांचा लेखाजोखा आणि आगामी काळात हाती घेण्यात बणाऱ्या कामाबाबत मुद्दे मांडले जातआहेत. त्यामुळे ऐन थंडीत प्रचाराचा उष्मा वाढला आहे.
न्यायालयीन प्रक्रियेच्या विलंबामुळे फलटण पालिकेची निवडणूक पुढे गेली होती. आता २० डिसेंबरला मतदान होणार आहे. पालिकेच्या १३ प्रभागांमधील २७जागांसाठी ७६ उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत महायुतीतील भाजप-राष्ट्रवादी युती आणि शिवसेना यांच्यात होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी आघाडी करत आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवून चांगलीच रंगत आणली आहे. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजेनाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजितराजे नाईक निंबाळकर, सत्यजितराजे नाईक निंबाळकर हे आपापल्या परीने सर्व प्रभागांमध्ये दौरा करत उतरले आहेत.
दुसरीकडे भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील,जिल्हा परिषद माजी सदस्य जिजामाता नाईक निंबाळकर, मनीषा नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुका अध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनी गतिमान केला आहे. उमेदवारांच्या घरोघरी भेटी, पदयात्रा दरम्यान तेच मुद्दे, तीच रिक्षाची धून, चौकातील डिजिटल प्रचार यामुळे मतदार राजा पुरताच वैतागला आहे. नगराध्यक्षांसह प्रभागातील सर्वच उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सत्ताधाऱ्यांसह विविध राजकीय पक्ष विकासाच्या मुद्यावर मतदारांशी संपर्क साधताना केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत आहेत, तसेच आगामी काळात हाती घेण्यात येणाऱ्या विकासकामांबाबतचे मुद्दे मांडले जात आहेत. पाणी, वीज, रस्ते, उद्योग, बेरोजगारी, झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन आणि शहरातील दहशत या मुद्द्यांवर भर दिला जात असल्याचे चित्र आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये रॅली, पदयात्रा, कोपरासभा आणि घर भेटीचा धूमधडाका सुरू आहे. प्रमुख नेतेमंडळी, उमेदवार आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे चार दिवस राहिले आहेत. २० डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. ज्येष्ठ नेतेही प्रचारात उतरले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून प्रचारात दहशत आणि पैसा हाच मुद्दा आणला जात असलयाचा विरोधकांचा आक्षेप आहे.
