सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) जावळी तालुक्यातीलसावरी गावात शनिवारी सकाळी छापा घालून मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थाचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर मुंबई, पुणे, साताऱ्यातील पाच दिवसांतील कारवाईत एकूण सुमारे ११५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईत विशाल मोरे या व्यक्तीसह त्याच्या सहा साथिदारांना अटक करण्यात आली. दरम्यान, मुंबई पोलीस आले अन् कारवाई करुन गेले, अशी स्थिती असून स्थानिक मेढा पोलीस असो अथवा स्थानिक गुन्हे शाखेला यामध्ये कोणत्याही प्रक्रियेबाबत माहिती नव्हती. याबाबत मेढा पोलीस ठाण्यातही कोणतीही नोंद झाली नाही.

स्थानिक पोलीस सुत्रांनी आम्हाला मुंबई पोलिसांनी तिकडे फिरकुही दिले नसल्याचे सांगत हात वर केले.

उपलब्ध माहितीनुसार, मुलुंड पश्चिममध्ये ९ डिसेंबर रोजी दोघांकडून १३६ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त राज तिलक रोशन यांनी दिली.या दोघांच्या चौकशीतून विशाल मोरे आणि अन्य आरोपींची नावे पुढे आली. साताऱ्यातील कारवाईत ७.५ किलो घन स्वरूपातील एमडी, ३८ किलो लिक्विड एमडी तसेच निर्मितीसाठी वापरला जाणारा कच्चा माल असा २५ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक अरुण थोरात, सहाय्यक निरीक्षक श्रीकांत करकर, सुहास खरमाटे, अमोल माळी, रामदास कदम, उपनिरीक्षक स्वप्नील काळे, महेश शेलार या पथकाने केली. सर्व आरोपींना मुंबईत नेण्यात आले असून या कारवाईत अटक करण्यात आरोपींना रविवारी मुंबईत नेण्यात आलेल्या सात आले. अटक आरोपींमध्ये कारखान्यात काम करणारे पश्चिम बंगाल, आसाम राज्यातील मजूर, तंत्रज्ञ, अमली पदार्थ वाहून नेणारे, विकणाऱ्यांचा समावेश आहे. या कारखान्यास आर्थिक सहकार्य करणारे, कारखान्यात तयार झालेला अंमली पदार्थ राज्याच्या कानाकोपऱ्यात विकणाऱ्यांच्या साखळीबाबत त्यांच्याकडे चौकशी केली जाईल, असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *