सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे माजी मानद सचिव इस्माईलसाहेब मोहम्मदसाहेब मुल्ला यांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त देण्यात येणाऱ्या इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्काराचे वितरण बुधवारी (ता. १७) दुपारी चार वाजता यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या सभागृहात होणार असल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात आली.
या वर्षीचा ‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार-२०२५’ ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र राज्य साहित्यआणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांना ज्येष्ठ समाजसेवक उल्हास पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष अॅड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, कायदा सल्लागार अॅड. दिलावर इस्माईलसाहेब मुल्ला यांच्या उपस्थितीत होणार आहे. सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले आहे.
