किरण खुडे

राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : राजगुरुनगर येथे प्रतिवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. येथील अंखंड हरिनाम सप्ताहाचे हे ४६ वे वर्ष असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे अध्यक्ष तथा राजगुरुनगरचे माजी सरपंच शांताराम घुमटकर व प्रदीप कासवा यांनी दिली. या सप्ताहाचा प्रारंभ मंगळवार पासून (दि.०२) झाला असून दि. ०९ डीसेंबर रोजी या सप्ताह कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

सप्ताह काळात दररोज पहाटे काकड आरती, सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, विष्णू सहस्त्रनाम, दुपारी नेमाचे भजन, सायंकाळी हरिपाठ, त्यानंतर हरिकीर्तन आणि अखंड वीनानाद असे कार्यक्रम सुरू आहेत. येथील ज्ञान मंदीरात नियमीत बारमाही ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व हरीपाठ हे कार्यक्रम होत असतात. सप्ताह कालावधीत ह.भ.प. भरत महाराज थोरात ( वडगाव पाटोळे), पोपट महाराज राक्षे ( वेहेळदरा), पोपट महाराज पाटील- कासारखेडेकर (जळगाव), यशवंत महाराज पाटील (ठाणे), मच्छिंद्र महाराज राऊत (नाशिक), दत्ता महाराज भोर ( संगमनेर), नरहरी महाराज सांगळे (आळंदी), सागर महाराज शिर्के ( शिरगांव) यांची कीर्तने होणार आहे.

या धार्मिक कार्यक्रमांसाठी परिसरातील भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळ आणि समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *