पुणे (हवेलीनामा वृतसमूह) महाराष्ट्र राज्य शासनाने शालेय शिक्षकांना टीईटी परीक्षा सक्तीची केल्यानंतर राज्यातील सर्व शिक्षकांनी आज शाळा बंद ठेवून या जाचक अटीचा विरोध दर्शवला आहे त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून शासनाने यावर योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे.

या आंदोलनामुळे राज्यातील जवळपास ६० हजार शाळा बंद राहणार आहेत शिक्षकांमध्ये टीईटी परीक्षेची भीती असल्याने ही परीक्षा सक्तीची करू नये कारण अनेक शिक्षक हे गेली १५ ते २० वर्ष शालेय शिक्षणाचे कार्य करत आहेत अशा वेळी ही शक्ती योग्य नाही.

टीईटी ही परीक्षा गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांना अनिवार्य करण्यात आली आहे नवीन शिक्षक भरतीच्या वेळेला ही परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य असल्याने सध्या शासकीय सेवेत असलेल्या शिक्षकांना देखील ही परीक्षा सक्तीची केल्याने राज्यातील सर्व शिक्षकांनी या सक्तीसाठी तीव्र विरोध दर्शवला आहे त्यामुळे शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

या संदर्भात पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती अध्यक्ष सुनील वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आजचा हा संप टीईटी परीक्षा सक्तीच्या विरोधात असून तसेच शासनाने 15 मार्च 2024 या दिवशीच्या संच मान्यता विरोधात देखील हा संप आहे कारण यामुळे ग्रामीण भागातील वाड्यावर त्यावरील ज्या शाळा आहे त्या बंद होण्याची शक्यता असल्याने अशा वाड्यावस्तीवरील शिक्षकांची संख्या कमी होणार आहे त्यामुळे शासनाने यावं त्वरित निर्णय घेऊन ही संच मान्यता रद्द करावी अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *