पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) कायदेशीररित्या महसूली रॉयल्टी भरून माती वाहतूक करत असलेल्या व्यवसायाला सहकार्य करण्यासाठी निगुडघर मंडल अधिकारी रु.1,00,000/- रुपयाच्या लाचेची मागणी केल्यानंतर ती स्वीकारताना लाचलुचपात प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्या. त्यांच्यावर भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालू आहे.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, रूपाली अरुण गायकवाड, वय-40 वर्षे, मंडळ अधिकारी, निगुडघर मंडळ, ता. भोर जि.पुणे.रा.ठी.14, संघवी लक्ष्मी विलास, वेताळ पेठ, नवीन कोर्टाजवळ भोर, जिल्हा पुणे यांनी माती वाहतूक करण्यासाठी तक्रारदारांकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती त्यावर तडजोडी आणती एक लाख रुपये आज सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान भोर शहराच्या बाहेर असणारे का मंगल कार्यालयामध्ये लाच स्वीकारली त्यावेळी त्यांना अटक करण्यात आले.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांनी भोर तहसीलदार यांच्याकडून दि. 19/11/2025 ते 10/12/2025 रोजी पर्यंतच्या कालावधीसाठी 200 ब्रास माती वाहतुकीचा परवाना घेतला आहे. त्यासाठी त्यांनी 1,26,230/- रुपये रॉयल्टी भोर तहसील कार्यालयात भरले आहेत. तक्रारदार हे ज्या भागातून माती उचलत आहेत त्या मंडळाच्या मंडळ अधिकारी लोकसेवक रूपाली गायकवाड यांनी दि. 30/11/2025 रोजी तक्रारदार यांच्या परवान्यामध्ये नमूद असलेल्या गाड्यांमधून माती वाहतुक करीत असताना त्या गाड्या अडवून इथून पुढे मातीच्या गाड्या चालू ठेवण्याकरिता व तक्रारदार करीत असलेल्या माती वाहतुकीच्या व्यवसायास सहकार्य करण्याकरिता त्यांनी 1,50,000/- रुपयाच्या लाचेची मागणी करून जोपर्यंत पैसे देणार नाही तोपर्यंत माती वाहतूक बंद ठेवायची अशी धमकी देऊन पकडलेल्या गाड्या सोडून दिल्या. त्यानंतर त्या तक्रारदारास वारंवार त्यांच्या कार्यालयात भेटण्याकरीता बोलवत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी दिनांक 3/12/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती.

आज दि.4/12/2025 रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता यातील लोकसेविका रुपाली गायकवाड यांनी तक्रारदारास भोर शहराच्या बाहेर अभिजीत मंगल कार्यालय भोर येथे बोलावून तक्रारदार कायदेशीररित्या माती वाहतूक करत असलेल्या व्यवसायाला यापुढे सहकार्य करण्यासाठी तक्रारदाराकडे 1,00,000/- रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पडताळणी झाल्यानंतर आज रोजी 4/12/25 रोजी 17:03 या. अभिजीत मंगल कार्यालयाचे जवळ भोरेश्वर नगर रोड पीराचा माळ, मोर, येथे रोडवर लोकसेविका रुपाली गायकवाड, मंडळ अधिकारी, निगुडघर यांनी तक्रारदार यांचेकडून 1,00,000 रुपयाची लाच पंचारामक्ष स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध भोर पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *