किरण खुडे
राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी ) : राजगुरुनगर येथील एसटी आगारात एसटी अवधूत मंडळाच्या वतीने दत्तजयंती उत्सव भक्तीभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम साजरे झाले.
सकाळी दत्तात्रेय मूर्तीस लघुरुद्र अभिषेक करून महापूजा करण्यात आली. दुपारी एसटी अवधूत मंडळाचे संगित भजन, महाआरतीचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी रंगनाथ महाराज नाईकडे (कडधे) यांचे दत्तजन्मावर प्रवचन झाले त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. राजगुरुनगर व परिसरातील असंख्य दत्तभक्तांनी या सोहळ्याचा आणि दत्तगुरु दर्शनाचा लाभ घेतला.
चिंतामण गोसावी, संतोष एरंडे, कालीदास चिखले, अनिल गोसावी, दिलीप कहाणे, दत्ता गभाले, पांडुरंग शिंदे, किरण मोरे, सोमनाथ आढळ, शशिकांत दळवी, दिगंबर पोटे, नंदकुमार पवार, राजेश कांबळे, गोरक्ष कोळेकर आदींनी उत्सवाचे नियोजन केले.
