पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पूर्व हवेलीतील लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत एक कोटी रुपयाचा माल हस्तगत केला या मालची किंमत आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे त्याची माहिती लवकरच देण्यात येईल,याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड व स्टाफ असे अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवित असताना लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत पहाटे ०५/०० वा. च्या सुमारास कांबळे वस्ती, थेऊर फाटा, ता. हवेलि, जि. पुणे येथे सुमित गुप्ता यांच्या गोडावून वर छापा कारवाई करून बनावट आर.एम.डी. गुटख्याची सुंगधीत तुंबाखु व विमल गुटखा पान मसाला तसेच गोडाऊनच्या बाजुस शेतामध्ये बनावट गुटखा तंबाखु तयार करण्याठी लागणारे कच्चामाल त्यामध्ये बनावट सुपारी, सुंगधीत तंबाखु, थंडक, केमिकल, गुलाबपाणी, प्रिन्टेड पाऊच, बॉक्स व पोती असा एकुण १,००,००,०००/- (एक कोटी रूपयांचा) रूपयांना माल जप्त करण्यात आला. तसेच बनावट गुटखा वाहतुक करण्यासाठी l मॉडिफाय करण्यात आलेली चारचाकी वाहन १. गोल्डन रंगाची इनोव्हा कार नंबर एम एच ४४ बी २०२३ २. गोल्डन रंगाची इनोव्हा कार नंबर एम एच १२ डी एम ०८८५ व ३. काळया रंगाची टाटा नॅक्सोन एम एच १२ क्यू टी ८४६२ अश्या तीन चारचाकी ५०,००,०००/- रूपयांची वाहने ताब्यात घेण्यात आली. तसेच रोख रक्कम १,३०,०००/- सापडली. बनावट गुटखा तयार करणा-या कंपनीचे मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता, वय २५ वर्षे, रा काळुबाई मंदिरा जवळ, पत्र वस्ती, थेऊर ता. हवेलि जि पुणे व कामगार १. रामप्रसाद ऊर्फ बापु बसंता प्रजापती, वय ५० वर्षे, रा. थेऊर गाव, पुणे मुळ उत्तरप्रदेश, २. अप्पु सुशिल सोनकर, वय ४६ वर्षे, रा. कांबळे वस्ती, थेऊर फाटा, ता. हवेलि जि पुणे मुळ गाव उत्तर प्रदेश ३. दानिश मुसाकीन खान, वय १८ वर्षे, रा. कांबळे वस्ती, थेऊर फाटा, ता. हवेलि जि पुणे मुळ गाव उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेण्यात आले असुन सुमित गुप्ता हा फरार झाला आहे.
बानावट गुटखा व बनावट सुगंधीत तंबाखु तयार करणारे कंपनीचे मालक व कामगार याच्या विरुध्द लोणीकाळभोर पौलीस स्टेशन गु.र.नं.२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३,२२३,२७४,२७५, अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६, चे कलम २६(२) (i) (iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह. पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पकंज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक. २ गुन्हे शाख पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड, तसेच पोलीस अंमलदार राजस शेख, संदिप जायय, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदिप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांबरे, शुभांगी म्हाळसेकर. दिनेश बारटेवाड यांनी केली आहे.
हा बनावट गुटखा ज्या परिसरामध्ये विक्री करण्यात आला आणि ज्यांनी हा गुटखा खाल्ला त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर कोणास जबाबदार धरणार, आज आमली पदार्थ विरोधी पथकाने केलेली ही एक उल्लेखनी कामगिरी सर्वसामान्यांना निश्चितच दिलासा देणारी ठरणार आहे परंतु अन्न व औषध विभाग नेमका काय काम करतो हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो हा बनावट कारखाना गेली कित्येक महिन्यापासून या ठिकाणी कार्यरत असणार मग याची भनक संबंधित विभागाला का लागली नाही हा प्रश्न अधोरेखित होतो.
