थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन ग्रामपंचायत थेऊर येथे साजरा करण्यात आला त्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत थेऊर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. यात ५४ नागरिकांच्या डोळ्याची तपासणी करण्यात आली. समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
त्यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच आप्पासाहेब काळे व ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे ग्रामपंचायत अधिकारी तुकाराम पाटील, दिव्यांग लाभार्थी तसेच अन्य ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते
