पुणे (हवेलीनामा वृतसमूह) प्रचंड लोकसमर्थनाच्या जोरावर टीम WACO ने आगामी PMC निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘स्नेह संमेलन व एकता संवाद’ कार्यक्रमानंतर एक मोठी राजकीय घोषणा करत PMC निवडणुकांत अधिकृतपणे प्रवेश करून प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मधून आपले उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले.

गेल्या काही महिन्यांत वाघोली, खराडी, चंदननगर, लोहेगाव आणि विमाननगर परिसरातील हजारो नागरिकांकडून मिळालेल्या प्रचंड पाठिंब्यानंतर वाको वेलफेअर असोसिएशन (टीम वाको) ने अधिकृतरीत्या राजकीय क्षेत्रात उतरल्याची घोषणा केली आहे.

कार्यक्रमादरम्यान स्पष्टपणे सांगण्यात आले की:“भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्धची बुलंद आवाज आता PMC निवडणुकीतही उमटवणार आहे.”

संस्थेचे अध्यक्ष अनिल कुमार मिश्रा म्हणाले: “जनतेचा पाठिंबा हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. जनता बदल मागेल, तर बदल नक्की घडेल.”टीम वाको ने वॉर्ड क्रमांक ३ आणि ४ मधून निवडणूक लढवण्याचा प्राथमिक निर्णयही जाहीर केला असून, अधिकृत उमेदवारांची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.या घोषणेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकता आणि चर्चेला उधाण आले असून, शहराच्या राजकीय वातावरणावर याचा ठळक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टीम वाकोने वाघोलीतील अनेक समस्या समोर आणून त्यावर शासनाकडे पाठपुरावा करून नागरी समस्या सोडविण्यासाठी मोठा संघर्ष केला. वाघोली महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर आजपर्यंत वाघोलीकर जे नागरी प्रश्न सोडवण्यासाठी झगडत आहेत त्याची सोडवणूक होत नाही.वीज, पाणी रस्ते या गरजा पूर्ण झालेल्या नाहीत त्यावर नागरिकांच्या मनात एक चीड निर्माण झालेली आहे. राजकीय पक्ष वेळ मारून नेतात परंतु सर्वसामान्य जनतेला दैनंदिन प्रश्न मात्र सतावतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *