लोणी काळभोर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी काळभोर येथील नेहरू चौका शेजारी घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन यात एक महिला गंभीर जखमी झाली असून या स्फोटानंतर घराची खिडकी रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी वर आदळल्याने दुचाकीस्वार जखमी झाला सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरीही घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे तसेच शेजारच्या इमारतीस देखील मोठा हादरा बसल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्य चौकामध्ये झालेल्या या स्फोटाची माहिती मिळतात स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले तसेच लोणी काळभोर चे सरपंच नागेश काळभोर देखील घटनास्थळी धावून जखमीस रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर घराची पाहणी केली या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला असून मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले.
हा गॅसचा स्फोट कशामुळे झाला याचे कारण अजून समजू शकलेले नाही.लवकरच याबद्दल माहिती समोर येईल.
