पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पिंपरी येथील महिला पोलीस शिपाई व ट्रॅफिक वार्डन यांनी रक्षात अधिक प्रवाशी वाहतूक करण्यासाठी रिक्षा चालकाकडून महिना पाचशे रुपये हप्ता द्यावा लागेल अशी बतावणी करून तडजोड रक्कम रु. ४०० ट्रॅफिक वार्डन करवी घेतल्यानंतर त्या दोघांवर लाच घेतल्या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, वर्षा विद्युल कांबळे वय 35 वर्ष, महिला पोलीस शिपाई नेमणूकः पिंपरी वाहतूक विभाग पिंपरी चिंचवड आयुक्तालय, राठी. लिंक रोड बौद्ध नगर, पिंपरी, पुणे (वर्ग 3) आणि कृष्णा मछिंद्र गव्हाणे वय 28 वर्ष ट्रॅफिक वार्डन, राठी. आळंदी वडगांव रोड,राममंदिरच्या समोर, आळंदी असे लाच स्वीकारणाऱ्याची नावं आहेत.

थोडक्यात माहिती अशी की,यातील तक्रारदार हे व्यवसायाने रिक्षा चालक असून त्यांच्याकडे स्वतःची रिक्षा आहे. ते मोरवाडी चौक, KSB चौक, पिंपरी, कुदळवाडी या परिसरात रिक्षाचा व्यवसाय करतात. दि. 17/11/25 रोजी तक्रारदार हे त्यांच्या रिक्षामधून जादा प्रवासी वाहतूक करीत असताना महिला पोलीस शिपाई वर्षा कांबळे व ट्राफिक वॉर्डन कृष्णा गव्हाणे यांनी तक्रारदाराची रिक्षा थांबवली यांचेकडे त्यांच्या रिक्षावर जादा प्रवासी वाहतूक याबद्दल कारवाई न करण्यासाठी 300 रुपये घेतले.पुन्हा दि 26/11/25 रोजी तक्रारदार KSB, पिंपरी चौकातून त्यांची रिक्षा घेऊन जात असताना वर्षा कांबळे व ट्राफिक वार्डन गव्हाणे यांनी परत त्यांची रिक्षा अडवली व त्यांनी तू नेहमीच या परिसरात जादा प्रवासी वाहतूक करीत असतो तुझ्या रिक्षावर जादा प्रवासी वाहतूक करत असल्याबाबतची कारवाई करायची नसल्यास प्रत्येक महिना ‘आम्हाला हफ्ता म्हणून 500 रुपये द्यावे लागतील’ असे बोलून 500 रुपयाच्या लाचेची मागणी केली याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.पडताळणी कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्या रिक्षावर जादा प्रवासी वाहतुक या नावाखाली कारवाई न करण्यासाठी स्वतःसाठी आणि महिला पोलीस शिपाई वर्षा कांबळे यांच्यासाठी पंचांसमक्ष तडजोडीअंती प्रत्येक महिण्यासाठी हफ्ता म्हणून 400 रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले, वर्षा कांबळे यांच्याकडे गेले असता त्यांनी ट्रॅफीक वार्डन गव्हाणे यांचेशीच बोलावे असे सुचविले.त्यानंतर ट्रॅफिक वॉर्डन कृष्णा गव्हाणे यांनी 13,05 वा. KSB चौक, पिंपरी येथे तक्रारदार यांचेकडून 400 रुपयाची लाच स्वीकारली असता आरोपी गव्हाणे यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर आरोपी लोकसेवक महिला हवालदार कांबळे यांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, व अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *