चाकण  (हवेलीनामा प्रतिनिधी)

चाकण नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा जोर चढत असताना आज कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीबाहेरील प्रमुख रस्त्यांवर प्रशासनाने पथारी व्यवसायावर तात्पुरती बंदी घालण्यात आली.

या बंदीमुळे शेतीमाल, भाजीपाला, फळे व इतर आवश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या लहान व्यवसायिकांना मोठा फटका बसला. रोजंदारीवर जगणाऱ्या अनेक पथारी व्यावसायिकांना दिवसभर विक्री करण्यास बंदी आल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली. साधारणपणे नेहमी गजबजलेला बाजार परिसर आज पूर्णपणे ओस पडलेला दिसत होता. रस्त्यावर शुकशूकाट निर्माण झाला होता.

व्यावसायिकांनी प्रशासनाकडून नाराजी व्यक्त करत सांगितले की, “आमच्या पोटावर पाय देऊन सभा घेण्यात काही अर्थ नाही. आम्ही रोज कमावतो तेवाच घर चालते. आम्हाला किमान पर्यायी जागेची सोय तरी करायला हवी होती.”निवडणूक प्रचाराच्या नावाखाली सामान्य नागरिक आणि लहान व्यवसायिकांचे हाल होणे योग्य नसल्याची भावना स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *