सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) येथील सातारा नगरपालिकेची निवडणूक प्रचाराची धामधूम जोरात सुरू आहे .येत्या दोन डिसेंबरला संपन्न होणाऱ्या या निवडणुकीसाठी 25प्रभागातून सुमारे अडीचशे उमेदवार आपले मेहरबान आमचे स्वप्न आजमावत असतानाच सातारा शहरातील कमानी हौद परिसरातील गुरुवार पेठेच्या सुप्रसिद्ध असणाऱ्या राजगोपाल द्रविड व त्यांची चिरंजीव ऍड अमित द्रविड यांच्या निवासस्थानासमोर सध्या प्रत्येक नागरिकाला अक्षरशः येऊन हा फलक वाचून खरोखरच अपेक्षित सुजाण लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण आपले बहुमोल मत दोन डिसेंबरला देणार का असाच प्रश्न पडत आहे. संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात अशा प्रकारचा योग्य निवाडा आणि त्यासाठी लोकप्रतिनिधींनी केलेली कामे याचा पाढाच प्रश्नावलीतून द्रविड परिवाराने या फ्लेक्स रुपी भव्य फलकावर छापलेला आहे .यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अव पालन,मध्यरात्री फटाके वाजविणे,सार्वजनिक उत्सवात डॉल्बी, लेर लाईट,अडथळा निर्माण करणारे धोकादायक व विनापरवाना फ्लेक्स,सायलेन्सर काढून अपरात्री कर्कश आवाजात बाईक चालविणे,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे,भटकी कुत्री नियंत्रण नाही,अवजड वाहनांचे गैरसोईचे पार्किंग,जीवघेणे दुर्लक्ष,रोड सेपरेटर परिसरात् फुटपाथ नाहीत.महिला/पुरूषांकरिता प्रभागात स्वच्छतागृहे पुरेशा प्रमाणात नाहीत,कोणतीही साफसफाई न करता एका दिवसात कोल्ड प्रोसेसने लगेच उखडणारा रस्ता,प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत,शहरातील तलाव आणि इतर जलस्त्रोतांची नियमित स्वच्छता नाही,अनधिकृत नळजोडणी,प्रमुख रस्त्यावर वेग मर्यादा फलक नाहीत,अतिक्रमणे,फुटपाथवरील अतिक्रमणाचा वाढता वेडा,बांधकाम परवानगी देताना सार्वजनिक पार्किन्न पालन केले जात नाही,अनधिकृत हातगाडे,नैसर्गिक प्रवाह, ओढेवरील अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष,पालिकेचे राखीव जागेमध्ये बांधकाम परवानगी,रस्त्यावरच अनधिकृत मांडव उभारणी,अनधिकृत फ्लेक्स,किमान गरजा,नियमित घंटागाडी नाही, कचरा वर्गीकरण होत नाही,कमी प्रकाशाचे पथदिवे.पाण्याचा अनियमित आणि असमान पुरवठा,रस्ता सफाई नियमित नाही,ट्रैफिक सिग्नल यंत्रणेचा पाठपुरावा नाही,नगरसेवक फिरकत नाहीत, कोणतीही मिटींग घेतली जात नाहीं,,सार्वजनिक पार्किंग व्यवस्था नाही,अन्यमैदान/क्रिडांगण नाहीत,इंटरसिटी बस, रेल्वे स्टेशन बस पाठपुरावा नाही,नागरिकाच्या समस्यांसाठी प्रभागात ऑनलाईन व्यवस्था करता आली नाही रस्त्यावरीलअयोग्य स्पीडब्रेकर्स कडे सपशेल दुर्लक्ष,नगरसेवक,रूग्णालय, पोलीस फोन नंबर लावलेले नाहीत.शहर परिसरात वृक्ष रोपणाचा केवळ देखावा .नगरपालिकेकडे असलेली दुर्लक्षित स्मशानभूमी सातारा नगरपालिका निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने कृपया लक्ष द्यावे.यासमस्यांबाबत या कालावधीत काम न केल्यास नागरीक सेवेत त्रुटी म्हणून आम्ही जबाबदार राहू: असे इच्छुक उमेदवारांनी जाहीर बंधनपत्र लिहून द्यावे. एव्हढीच हतबल मतदार नागरिकांची माफक अपेक्षा सुद्धा द्रविड परिवाराने समस्त मतदानागरिकांकडून केलेली आहे त्यामुळे इतक्या योग्य पद्धतीने निवडणूक होऊन खरोखरच लोकप्रतिनिधी काम करतात का? आणि त्याचा परिणाम सामान्य नागरिक आणि जनतेला सहजपणे उपभोगता येतो का ?असाच प्रश्न हा फलक पाहिल्यावर पुढे येत आहे/ एकंदरीतच कोणाचीही भिडभाड न ठेवता अशा पद्धतीने सामान्य मतदाराने लोकप्रतिनिधींना विचारलेले प्रश्न हे खरोखरच लोकप्रतिनिधींना आपल्या कार्याची पोचपावती देणारे असून या प्रश्नांमुळे हे लोकप्रतिनिधी निरुत्तरच होतील असेच मत अनेक सुजाण नागरिक या फलकाकडे पाहून व्यक्त करत आहेत .
दरम्यान ,या फलकाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून हा फलक अक्षरशः सुजाण मतदार आणि सामान्य नागरिक प्रत्येक सोशल मीडियावरील ॲपवर पाठवून खऱ्या अर्थाने आपला लोकप्रतिनिधी कसा असावा आणि या सर्वांची तो प्रश्नांची उत्तरे देणार का असाच प्रश्न एकमेकाला करीत आहेत
