राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : वाफगाव येथील राजेंद्र देवराम शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. शिंदे हे मुख्यमंत्री सचिवालयात सेवेत होते.

मुंबई मंत्रालयात कार्यरत असताना त्यांचा गावाशी कायम संपर्क होता. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे व पांडुरंग फुंडकर यांच्या कार्यालयात सेवा केली. गेल्या वीस वर्षांपासून वाफगाव येथील होळकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांनी भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या व वेळोवेळी गरजेनुसार मदत केली. त्यांचा गावच्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात नेहमी सहभाग होता. मुबई येथील एमएमआरडीएचे सेवानिवृत्त अधिकारी उल्हास शिंदे यांचे ते बंधू होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *